जीवाला
जन्म मिळाला की
त्याबरोबरच कर्म ही
आलेच असे संत
म्हणतात .किंबहुना जन्म हे
पूर्व कार्मांचेच फलित
आहे असे वेदांत
सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे
फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य
माणसे जन्म मरणाच्या
फेर्यात अडकून पडतात . तेव्हा
कर्म हे काही टाळता
येत नाही आणि
कर्म केले की
त्याचे फळ हे
मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म
व मरणाचा हा
फेरा चुकवावा तरी
कसा ? हा तिढा
सुटणार तरी कसा
? मोक्ष मिळणार तरी कसा ?
पहिले
आपल्याला हे उमजणे
आवश्यक आहे कि
कर्म घडतात तरी
कशी ? कर्माचे मूळ
अधिष्ठान कुठे आहे
? विचार केला कि
लक्षात येते कि
कर्माचे मूळ ' इच्छा ' हे
आहे . इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास
भाग पाडते. मग ‘ इच्छा
’ कुठून उत्पन्न होते ? तर
ती मनातून उत्पन्न
होते . म्हणजेच सर्व कर्मांचे
मूळ हे आपले
मन आहे . मनात
इच्छा का उत्पन्न
होतात ? मन हे
अहं भावनेने भरलेले
असते. ते सतत
आपले अस्तित्व दाखवण्या
साठी झघडत , धडपडत
असते . आपले अस्तित्व
टिकवण्यासाठी ते सतत
इच्छा निर्माण करत
असते व कर्म
घडवून आणत असते
. मन हे इच्छे
वरच जगते
. कर्मांच्या फालावारच ते जगते
व पोसले जाते
. कर्म संपली की मनाचे
अस्तित्वच संपले . वेदांत व
संतांची उक्तीच आहे की
' मन ' मेले की
' अहं किंवा ' मी
' मारतो , ' मी ' मेला
की कर्म कसे
घडणार ? घडणारच नाही ! , आणि
कर्माच जर संपले
तर फळ कोठून
येणार ? फळच नाही तर
ते भोगायला जन्म
कुठचा ?
आपण
वर पहिले की
कर्म कसे घडते
. पण कर्म म्हणजे
नेमके काय ? त्याची
संज्ञा काय ? हे
पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा
की तुम्ही या
जगात एकटेच आहात
दुसरे कुणीच नाही
! मग तुम्ही खाता
, पिता , झोपता ,चालता , फिरता
, विश्रांती घेता तेव्हा
कर्म घडते का
? नाही घडत ! हे कर्म
जरी असले तरी
ते वेदांतात अपेक्षित
असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत
नाहीत . तेव्हा ही कर्मे
नव्हेत . आता समजा
तुम्ही चालला आहात . चालता चालता
तुम्हाला एक मुंगी
दिसली व तुम्ही
तिला ठेचलीत तर
हे मात्र कर्म
झाले . किंव्हा
तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत
असताना एक व्यक्ती
बुडताना पाहून तुम्ही त्या
व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे
सुद्धा कर्म या
संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा
विचार केल्या वर
लक्षात येईल की
कर्म घडण्या साठी
त्या कर्माचे संस्कार
एकापेक्षा अधिक जीवांवर
घडले पाहिजेत . तेव्हाच
कर्म घडते . हे असे
आपले मला वाटते
, तुम्हाला ते पटेलच
किंव्हा पटलेच पाहिजे असे
नाही . पटले तर
घ्या नाहीतर सोडून
द्या .
आता
आपण पहिले की
, मनातल्या ' मी ' ला
मारले की मन
मरते . मन मेले
की कर्म घडत
नाही . मग मनाला
मारावे म्हणजे काय ? व
ते कसे करावे
?
कठ
उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म
ही दोन
प्रकारची असतात . एक असते
' श्रेयस कर्म ' व दुसरे
असते ' प्रेयस
कर्म ' . जीवाने कोणत्या
कर्माचा आचार करावा
हे सर्वस्वी त्याच्या
हातीच असते .मनाचा
कल हा नेहमी
प्रेयासाकडे असतो . तो प्रथम
श्रेयासाकडे वळवायला हवा कारण
प्रेयासामधून फक्त विषय
सुखाची प्राप्ती होते व
' मी ' ची लालसा
वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे
? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक
कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास
समर्थ आहे . ते नसेल तर काही उपयोग नाही .
मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते
मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला
की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले
की द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट
होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच
नाही !
संत
सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....
आलो
नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I
जागृत
होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग हरले
I
No comments:
Post a Comment