आज मिसळ पाव या ब्लॉग वरील एक लेख सहज वाचनात आला त्याच बरोबर त्या लेखावरील उत्तरा दाखल लिहिलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया
वाचून खूप आश्चर्य युक्त दु:ख ही झाले . ही उत्तरे पाठवणारी पिढी साधारण पणे २५ ते ४० या वयोगटातील असावी असा माझा अंदाज ( अंदाजच ) आहे .ही पिढी उच्च विद्या विभूषित दिसते व सर्व गोष्ठी आजच्या भवतिक विज्ञानाच्या निकषांवर घासून पडताळू पहाते. हे चूक आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही , किंबहुना ही वृत्ती योग्यच आहे , पण प्रत्येक गोष्टीत " बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " असे म्हणण्याची प्रवृत्ती जी अलीकडे फोफावत चालली आहे , ती योग्य नव्हे असे मला वाटते . वरील ब्लॉग वर "राधा - भक्त का प्रेयसी" (http://www.misalpav.com/node/16488 ) हा लेख सायली थत्ते यांनी लिहिला आहे .त्या या लेखातून जे सांगू इच्छितात ते खरोखर वाखंन्या जोगे आहे व पटण्या सारखे आहे . पण त्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचता सुकृत दर्शनी तरी असे दिसते की सायली थत्ते यांनी काय म्हंटले आहे हेच मुळी प्रतिक्रिया देणार्यांना कळलेले नाही किंवा उगाच काहीतरी टिंगल व विषयांतर करण्या साठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.
मुळात ज्यांना त्या विषया बद्दल काही माहितीच नाही , किंवा ऐकीव माहिती आहे ज्याचे विद्रुपीकरण झाले आहे, अशा लोकांनी तिथे प्रतिक्रिया दिलेल्या आढळतात .श्री कृष्णाची जी ओळख त्यांना आहे ती सिनेमातली गाणी , टीवी सिरिअल्स , गोविंदा यातूनच जास्त झाली आहे असे दिसते . या पैकी कोणीही खरोखर श्री कृष्णाला जाणून घेण्याचा कधीही तिळमात्र प्रयत्न केल्याचे दिसत नाही . रस खान , सूर दास , श्री वाल्लाभाचार्यांचे मधुराष्टकम कधी त्यांच्या वाचनात आले असेल से वाटत नाही . भागवताचा तर प्रश्नच उद्भवत नाही .सायालीजींचे म्हणणे रस्ताच आहे . त्या म्हणतात -
"
श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही."
श्री कृष्ण जेंव्हा गोकुळातून मथुरेस गेले तेंव्हा त्यांचे वय साधारण ८ वर्षाचे होते .गोकुळातल्या त्यांच्या लीला या त्या वयातल्या होत्या .श्री कृष्ण म्हणजे गोकुळातल्या गोप गोपिकांचा श्वास , प्राण व आत्मा होते . कंसाच्या राज्यात पिचून गेलेल्या गोप गोपिकांना श्री कृष्ण म्हणजे रणरणत्या उन्हात सुकून गेलेल्या वसुंधरेवर पडलेला वर्षेचा शीतल शिडकाव .गोकुळातल्या गाइन पासून मिळालेले दुध , दही व तूप हे सर्व मथुरेस पाठवावे लागत असे .बिचार्या गोकुळ वासीयांच्या मुलांना काही मिळत नसे .श्री कृष्णाने त्या विरुद्ध बंड पुकारून हे बंद केले .श्री कृष्णा मुळे गोपिकांच्या मुलांना दुध दही मिळू लागले .त्या मुळे गोपिकांना श्रीकृष्णा बद्दल कृतज्ञता व वात्सल्य वाटले तर त्यात नवल कसले ? त्यात कोणती ही भिभत्स्य व शृंगारिक भावना असण्याचे करणाच काय ? श्री कृष्णाला पहिल्या बरोबर गोपिकांना पान्हा फुटत असे , त्यात तरुण लग्न न झालेल्या गोपिकां ही आहेत व जखड म्हातार्या ही आहेत . त्या श्री कृष्णाला आपले दुध पाजत .असा उल्लेख भागवतात आढळतो . असा पान्हा आईच्या वात्साल्यानेच फुटेल की यात काही भिभत्स्य व शृंगारिक पणा आहे ? श्री कृष्ण आणि गोपिकांच्या नात्या मध्ये पाश्चिमात्य लोकांनी हा शृंगारिक पण गुसावला.हिंदू सौंस्क्रूती त्यांच्या समजण्या पलीकडची आहे व होती. वेद आणि उपनिषदांचे ही त्यांनी ( Max Mueller व इतर ) केलेले विद्रुपीकरण असेच आहे .हिंदू सौंस्क्रूती ला जाणून बुजून खाली पडण्या साठी केलेला हा एका इंग्रजां करवी प्रायोजित कटाचा भागच आहे.
वर म्हटल्या प्रमाणे श्री कृष्ण म्हणजे गोकुळातल्या गोप गोपिकांचा श्वास , प्राण व आत्माच होते. त्यांच्या गोपिकां बरोबर वृंदावनात केलेल्या रास लीला या आई व तिच्या तान्हुल्याचे खेळच आहेत. आई नाही का आपल्या लहान बालका बरोबर लपाछपी सारखे इतर खेळ खेळत ? आईचे दुध पिताना बालकाचा हात आईच्या उरोजाबरोबर खेळण्याची चेष्टा करत असतो . यात आईला काही भिभत्स्य वाटते का ? यात कोणता शृंगार आहे की कोणती वासना ? दुध पाजणे ही तर आई साठी जिवाशिवाची भेटच असते .त्यात तिच्या मातृत्वाचा परमोच्च शिखर असतो व अमृत तुल्य तृप्ती असते .
श्रीकृष्णांनी
आपल्या नाना लीला मधून गोकुलीतल्या सर्व गोपिकांना ही जिवाशिवाची भेट घडवून दिली . त्यामधूनच या कृष्ण गोपिकां च्या कहाण्या निर्माण झाल्या . गोपिकां ना श्री कृष्णा बद्दल वाटणारे वात्सल्य युक्त प्रेम , त्यांची श्री कृष्णांच्या चरणी असलेली निष्टा व भाव यातूनच काल्पनिक राधा निर्माण झाली असे मला वाटते . गोपिकां चे कृष्णा बद्दल असलेले सर्व भाव त्या राधे मध्ये एकवटले आहेत . राधा हे सर्व गोपिकां चे एकीकरणच आहे . त्यातूनच मग " राधा भाव " जो आज सर्व लोक प्रचलित आहे तो सिद्धांत वर आला . पण पुढे त्याचे नको ते भ्रष्ट वर्णन करण्यात आले . आज लोकां ना " राधा कृष्ण “ म्हंटले की काय अभिप्रेत आहे हे सायली थत्ते यांच्या अनुभावरून कळेल
“ आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -
१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.
२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.
३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!
एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी –
The court said even Lord Krishna and Radha lived
together according to mythology. 'http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marita... “
रस खान नावाचे एक मधूरा भक्तीत लीन असले ले मोठे कृष्ण भक्त मथुरेत होवून गेले . त्यांनी लिहिलेल्या एका गीतात गोपिकां चे श्री कृष्ण बद्दलचे प्रेम सुंदर रित्या शब्दांत प्रकट होते. वर्णन केलेला प्रसंग असा आहे की कृष्ण उद्धवाला गोकुळात गोपींना समजवण्यास पाठवतो की तुम्ही गोपिकां तर ज्ञानी आहात तेंव्हा तुम्ही असा माझ्या करता विलाप करणे शोभत नाही . तेंव्हा गोपिकां काय म्हणतात ते खाली दिले आहे .
ओ श्याम रे , मोरे श्याम रे , मोरे श्याम ही ........ रेश्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)
अंग अंग व्यापी , रग रग राँची (२)
रोम रोम उरझानी (२)
के श्याम तोरी मूरत ह्रदय समानी
जिथ देखू तीथ तू ही दिखत (३)
दृष्टी कहाँ बौरानी (२)
श्रवण सुनत नित ही बंसी धुन (२)
देहि रही लिपटानी
रे श्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)
उधौ कहत सन्देश तिहारो ,ऊधौ कहत.. ,उधौ कहत सन्देश तिहारो ,
हम ही बनावत ज्ञानि
कहो थल जहाँ ज्ञान को राखें
हरी जूठन रसखानि
रे श्याम तोरी मूरत ह्रदय समानी (२)
त्या गोपी शेवटी उद्धवाला म्हणतात , अरे तू ज्ञानी ज्ञानी म्हणून आम्हाला फसवू पाहतोस होयरे .अरे तू आम्हाला हे सांग कि तू जे ज्ञान ज्ञान म्हणतोस ते आम्ही ठेवू तरी कुठे व आहे तरी काय ती चीज ? .त्या श्री कृष्णाने आमचे अंग अंग व्यापले आहे . इतके की आमच्या धमन्यांतून ही तोच वाहतो रक्त नव्हे ! शरीरातला कण अन कण त्याच्यामुळेच उर्र्जीत आहे .अश्या ह्या कृष्णाला सोडून आम्ही तेतु जे ज्ञान ज्ञान म्हणत आहेस त्याचे आम्ही काय करू ते कुठे ठेवू ? सांग ना ? अशी कोणतीच जागा आमच्या कडे शिल्लकच नाही जी आमच्या कृष्ण कन्हैया ने व्यापली नाही. जिथे पाहतो तिथे कृष्णच दिसतो . त्याच्या वेळूची मधुर धून आम्ही सतत ऐकत व श्रवण करत असतो . त्या बसुरीचे सूर आमच्या शरीराला चिकटून असतात . त्या एका कृष्णा शिवाय आम्हाला काही दिसत नाही सुचत नाही . आमच्या ह्रिदयात त्याची मूर्ती सामावली आहे . तोच आमचा पंच प्राण व आत्मा आहे . तो इथे गोकुळात नाही तर आम्हाला प्राण शरीराला सोडून गेल्याच्या यातना होत आहेत ! उद्धवा आणि तू आम्हाला ज्ञानाचे डोस पाजतोस का ? हे होते गोपीं चे कृष्णा बद्दल चे प्रेम . ह्या गोपींच्या प्रेमाला भक्तीचा , वात्सल्याचा , अध्यात्माचा पाया आहे . वासनेचा व शृंगारीक्तेचा लवलेश ही याला शिवलेला नाही .
उधो, मन न भए दस बीस।
एक हुतो सो गयौ स्याम संग, को अवराधै ईस॥
सिथिल भईं सबहीं माधौ बिनु जथा देह बिनु सीस।
स्वासा अटकिरही आसा लगि, जीवहिं कोटि बरीस॥
तुम तौ सखा स्यामसुन्दर के, सकल जोग के ईस।
सूरदास, रसिकन की बतियां पुरवौ मन जगदीस॥
अरे उद्धवा मन तर आमच्या कडे एकच आहे रे , दहा वीस मने नाहीत की आपलं एक मन एका गोष्टीत रमवावे व दुसरे मन दुसऱ्या गोष्टीत . आता तर ते एक मनही आमच्या कडे उरले नाही रे , ते तर केह्वाच त्या कृष्णा बरोबर मथुरेस गेले . मग आम्ही कोणत्या मानाने तू जे निर्गुण निराकार ब्रम्ह म्हणत आहेस त्याची उपासना करू ?
त्या माधवा विन आमची गत शिरा विन असलेल्या शरीरा सारखी झाली आहे .आम्ही कृष्ण वियोगिनी आहोत . त्या माधवाच्या पुनर मिलनाच्या आशेवर आम्ही आमचे प्राण या बिन शिराच्या शरीरात कोटी वर्ष्ये सुद्धा ठेवून देवू . उद्धवा तू तर त्या कृष्णाचा परम सखा आणि शिष्य आहेस . तू तर परम योगी आहेस मग तुला हे कसे कळू नये ? तुला आमची झालेली दशा का दिसू नये ?
या वरून लक्ष्यात येते की गोपिकांचे आणि श्री कृष्णा चे नाते हे गुरु व शिष्यांचे जे नाते असते तेच होते . त्या गोपिकां श्री कृष्णाच्या मार्गदर्शना खाली उत्तम योगी झाल्या होत्या .कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तेंव्हाच त्यांना श्री कृष्णाचे परमेश्वर स्वरूप लक्ष्यात आले होते .अश्या या गोपिकांच्या व श्री कृष्णाच्या लीलांना शृंगारिक म्हणणे किती चूक आहे ?
कामदेवाला ही एकदा या लीला शृंगारिक वाटल्या व त्याचे कसे गर्व हरण झाले ते पुढच्या भाग २ (कृष्ण व गोपिकां (२. कामदेवाचे गर्व
हरण )) मध्ये
सांगण्यास जरूर आवडेल . तो पर्यंत इतकेच .
आवडल्यास व पटल्यास जरूर शेयर करा ही विनंती.
No comments:
Post a Comment