दत्त चरणी अर्पण व्हाहो
दत्त नाम नित्य स्मरा हो
दत्त सुखे म्हणा हो दत्त मुखे म्हणा हो
दत्त लिन करा हो
अहं आपुले
दत्त जे पाही हो कृपा दृष्टि
चौर्याशी ची चुकली भ्रमिष्टी
आत्मानंदे वो वसती
चिरंतन
मेघ म्हणे दत्ता तुम्ही बना हो आभाळ
आता न होऊ द्यावी आबाळ
बालकाची
रविवार दिनांक ९/७/२०२३ , ८:२७ AM
अजय सरदेसाई 'मेघ'