हृदय गर्भात प्रतिष्ठीला शिव
आनंदे सुखावला माझा जिव
भक्ती ज्योत केली सजिव
पेटवुन अंतरी
दशदिशा श्रोत्रांतुनी
घेतल्या आत आकंचुनी
उसळला
नाद त्यातुनी
ओंकाराचा
घेतले मिटुनी दोळे
दृष्टी
वळविली आंत
प्रकाश भरला ओतप्रत
जणू हिरण्यगर्भ तो
रोमरंध्रांस केले शांत
स्पर्शची नूरली भ्रांत
पद्मासनी बैसलों निवांत
विसरोनिया सर्व सृष्टी
मूळाधारातून ती शक्ती
येई
जेवी लाट उसळून
तेवी एक एक चक्र उलंघोनी
वर
शिव मिलनास येतसे
सहस्रसारांत झाले मिलन
याचे शब्दातीत असे वर्णन
सहस्त्रकोटी दामिनी जणू
कडाडल्या एकाच क्षणी
प्रखर त्या प्रकाशस्रोतांत
दिसला मज तो जो कर्पूरगौर
आदित्य तेज ज्या मुखी सौर
अखंड पसरलेले
रविवार , ३०/०६/२०२४ ०५:३० PM
अजय सरदेसाई (मेघ)