अश्रद्धया हुतं दत्तं
तपस्तप्तं कृतं च
यत I
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह
II भ.
गि . १७-२८
हे
पार्थ , अश्रद्धेने केलेले हवन
,दिलेले दान , आचरलेले तप
व केलेले जे
कर्म असेल त्याला
अ सत असे
म्हणतात . हे अ
सत या लोकी
व परलोकीही लाभदायक
नाही . म्हणून भगवंताला अर्पण
करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता
आहे .
खूप
पूर्वी एकदा भारतात
मोठा दुष्काळ पडला
होता . एक गाव
जे पूर्णपणे शेतीवरच
निर्भर होते ते
ह्या दुष्काळाच्या कचाट्यात
खूप वाईट
सापडले.पावसा अभावी नद्या
,नाले , झरे , विहिरी सुकल्या , जमीन
कोरडी पडली . अन्न
नाही , पाणी नाही
, प्राण्यांना द्यायला गवत नाही
अशी परिस्तिति. त्यात वरून सूर्याचे
व खालून जमिनीचे
रणरणत्या निखार्यागत चटके. हळू
हळू प्राणी व
लोकं मारू लागले.पाण्याच्या एका थेंबा
साठी व एका
अन्नाच्या घासासाठी चोर्या व
दरोडे पडू लागले.
गावची लोकं बिचारी
हवालदिल झालेली .
शेवटी
गावच्या जाणत्या लोकांनी गावातील
देवळाच्या पुजार्याला विनंती केली
दुष्काळ जाण्यासाठी आणि वर्षा वृष्टी होण्यासाठी काहीतरी दैवी उपचार करावे . पुजारी
ब्राम्हणाने सांगितले कि उद्या सर्व गावकर्यांनी मंदिराच्या प्रांगणात जमावे . आपण
सर्व मिळून परमेश्वराची प्रार्थना करूयात , पाउस नक्की पडेल व दुष्काळ मिटेल .
दुसऱ्या दिवशी
सांगितल्या प्रमाणे सगळे गावकरी
देवळाच्या प्रांगणात जमले .एक
गरीब गावकरी जो
जरा उशिरा पोचला
होता त्याचाकडे सर्व
अचंब्याने पाहू लागले
. जणू काही विचित्र
देखावा पाहावा तसे . त्या
गावकर्याने सोबत छत्री
आणलेली होती .रणरणत्या उन्हात
, पाउसचे एक हि
चिन्ह किंवा ढग
नसताना ह्या वेड्याने
छत्री आणली हे
पाहून सर्व गावकरी
हसून जणू त्याची
टर खेचू लागले
.दृश्य होते हि
मोठे विचित्र .पाउस
नाही , पाउसाचा थेंब नाही
आणि हा आपला
आला छत्री घेऊन
! असो .
प्रार्थनेचा
कार्यक्रम यथासांग पार पडला
व सर्व आपापल्या
घरी जाण्यास निघाले.कुतूहलाने व कुत्सित
पणे काही लोकांनी
त्याला छत्री आणल्या बद्दल
विचारले .
"आर वेड्या , पाउसाचा मौसम
नाई , पाउसचे चिन्ह
कुणीकडे दिसत नाई
, आणि तुरे मारे
छत्री घेऊन आलास
. कश्या पाई ?
तो
गावकरी म्हणाला " लोकांनु
, देव देतो नि
देवच घेतो . मला
खात्री हाय कि
देव आपली प्रार्थना
ऐकेल आनी मोप
पाउस पडल , देवाच्या
करणीने दुष्काळ मिटल ."
लोकं
त्याच्यावर हसायला लागले, त्याला
वेडाऊ लागले , त्यांना दिसत होते
ते रणरणते उन
जे आजूनही अंगाला
चटके देत होते
.त्याची श्रद्धा व विश्वास
कोणालाही दिसत नव्हता
.
आणी
अचानक , अघटीत घडले ...
सुसाट
वारा वाहू लागला
, काळे ढग जमू
लागले , वीज कडाडली
आणी धोधो पाउस
पडू लागला . सर्व
गावकरी विस्मयीत झाले , त्यांच्या
कुत्सित नजरा पाणावल्या
. त्यांचे डोळे उघडले
.त्यांनी मान्य केले कि
त्या एकट्या गावकर्याच्या
भक्ती पूर्ण व
श्रद्धेने केलेल्या प्रार्थने मुळेच
पाउस पडला . बाकी
सर्व गावकरी फक्त
नावाला जमले होते
.