एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र
नारद मुनी , दुखी:
व कष्टी होवून
गप्प बसले होते
.
ब्रह्मदेवांनी
त्यांना विचारले 'पुत्रा तू
इतका कष्टी का
दिसतोस ?'
नारद म्हणाले ' पिताश्री मी
सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण
मी जाणत नाही
कि सद्गुरु कसे
असतात त्या मुले
मी दुखी:
व कष्टी झालो
आहे . मी सर्व
वेदांत , १८ पुराणांत
, ६४ कलांत पारंगत
असा आहे तरी
हि मी सद्गुरु
कसे असतात हे
जाणत नाही !ब्रह्मदेव
म्हणाले ' बस इतकेच
न ? फार सोपे
आहे ते . तू
असे कर पृथ्वीतलावर
जा . तिथे सहस्त्रगुण
राजाच्या महालात एक कोळी
आपे जाले विनात
आहे .तो तुझ्या
प्रश्नाचे उत्तर तुला देयील
.
नारद मुनी आनंदानी
त्या कोळ्या पाशी
जाऊन पोचले . त्यांनी
त्या कोळ्याला अत्यंत
विनयाने विचारले 'ओ उर्नानाभा अष्टपादा , सद्गुरु
कसे ओळखावे व
ते कसे दिसतात
हे मला
समजावण्याची आपण कृपा
करावी '. कोळ्याने नारद मुनींकडे
एक कटाक्ष टाकला
व बोलण्यासाठी मुख
उघडण्याच्या आतच तो
मृत झाला ! नारद
मुनींना खूप वाईट
वाटले व परतून
त्यांनी सर्व वृतांत
आपल्या पित्यास सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले ' काही
काळजी करू नकोस
पुत्रा! सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत
नुकतीच एक गाय व्याणार
आहे . तू तिथे
जा व त्या
नवजात पाडसाला तुझा
प्रश्न विचार .ते तुझ्या
प्रश्नाचे उत्तर देयील . नारद
पुन्हा पृथ्वीतलावर सहस्त्रगुण राजाच्या
गोशालेत आले . तिथे एक
गाय एका पाडसाला
जन्म देत होती
. जन्मताच पाडस उठून
उभे राहिले . नारद
मुनींनी त्या पाडसाला
पुन्हा तो प्रश्न
हात जोडून विचारला
, पाडसाने एक कटाक्ष
नारद मुनींन टाकला
व काही बोलण्यासाठी
मुख उघडण्या आत
ते मृत झाले
!नारद मुनी काहीतरी
शाप लागण्याच्या भीतीने
घाबरून गेले व
दुखी: मानाने पुन्हा
परतले . त्यांनी सर्व वृतांत
आपल्या पित्याला सांगितला . कोळी
आणि पाडस माझे
मुख पाहताच माझ्या
प्रश्नाचे उत्तर देण्या आगोदरच
मृत झाले .मी
इतका का वाईट
आहे कि ती
दोघे माझ्हे मुख
पाहता क्षणीच मृत
झाली ? ब्रह्मदेवांनी नारद मुनींना
काळजी न करण्याचे
आश्वासन दिले व
म्हणाले ' नारदा सहस्त्रगुण राजाची
राणी एका सुंदर
मुलाला लवकरच जन्म देणार
आहे तेव्हा तू
तिथे जा , ते
मुल तुझ्या प्रश्नाचे उत्तर
तुला नक्की देयील
'.नारद मुनी सहस्त्रगुण
राजा कडे गेले
. राजाने त्यांचा आदरसत्कार केला
व म्हणाला ' मुनी
मला नुकतीच पुत्र
prapti झाली आहे तेव्हा
तुम्ही त्याला येवून आशीर्वाद
द्यावा ' व नारद
मुनींना घेवून तो आपल्या
महालात गेला . त्या नवजात
बालकाला पाहताच जड अंतकरणाने
त्याला आपला प्रश्न
विचारला . ते नवजात
बालक बोलू लागले ' ओ
श्रेष्ट नारद मुनी
! आपण मला ओळखले
नाही का ? मी
तोच कोळी ! माझ्या
आयुष्याच्या अन्त्क्षणी तुम्ही मला
दर्शन दिले व
मी कोळ्याच्या वोनीतून वरच्या योनीत
जन्म घेतला व
एका गायीच्या पोटी
पाडस म्हणून जन्माला
आलो ! माझे आहो
भाग्य की जन्मताच
मला तुमचे दर्शन
झाले व तत्क्षणी
मी त्या योनीतून
मुक्त होवून एका
राजकुळात मनुष्य रूपाने जन्म
घेतला .तुमची परम कृपा
की इथेही तुम्ही
मला दर्शन दिलेत
व आपल्या कृपेने
आता मी मोक्ष
पावून या जन्म
मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त
होत आहे '. असे
म्हणून ते बालक
तत्क्षणीच मृत झाले
.
गोष्टीचे तात्पर्य :
सद्गुरु हे शुद्ध
चैतन्य रूप असतात
, त्यांच्या एका कृपाकटाक्षात
सर्व पापांना व
संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची ताकद
असते .
ध्यान मुलम गुरुर
मूर्ती
पूजा मुलम गुरुर
पदम
मंत्र मुलम गुरुर
वाक्यं
मोक्ष मुलम गुरुर
कृपा .
ॐ श्री सद्गुरुवे
नमः
ॐ श्री चैतन्य
सद्गुरु गिरीशनाथाय नमः
No comments:
Post a Comment