मनी वारीची रे आस
माझा चालला प्रवास
लोक आषाडी, कार्तिकी
माझी अंतरी निरंतरी
रोमा रोमातून माझ्या
वाहे चंद्रभागेचा प्रवाह
पांडुरंगाची पालखी नित्य
अंतर-सॊहळ्यात
बाहेर गजराचा डोंब
टाळ मृदंगाचा थाट
आंत उभा पांडुरंग शांत
स्मित गूढ ओठांत
मन झाले पांडुरंग
काय विरली पंचत्वात
मी नाचतो निळ्या संगे
निळ्या हृदय डोहांत
शनिवार १०/०४ २०२१ १०:१० AM
अजय सरदेसाई (मेघ)