Total Pageviews

Tuesday, 8 March 2022

मृदा आणि उदक

 




उदक हे प्राण जाण , निराकार निर्गुण

मृदा हे शरीर जिवाचे, त्रिगुण निहित

मृदा-उदक घर्षण करी तेज प्रगट

मृदेशी संपर्क होता दिसे उदक षड गढूळ

वृत्ती षड मृदेची , हा  तिचाच धर्मगुण

उदक निर्मळ सर्वथा असे सदा निर्गुण

सत्ता षडाची विकट होता उदकाची होई वाफ

उदका पासून विलग, उरते मृदा , निस्तेज, निष्प्राण

 

वरील कवितेत शरीर आणि आत्मा ( म्हणजेच प्राण ) यांचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केले आहे . प्राण किंवा आत्म्यास उदकाची सान्या दिली आहे व शरीराला पृथ्वीची ( मृदा ,माती )

उदक म्हणजे 'आप' पंच महाभूतांपैकी एक पण या उदकताच (HO) प्राण वायू ( oxygen ) प्रतिष्ठापित आहे .

मृदा म्हणजे माती ( पृथ्वी - पंचमहाभूतांपैकी एक ) या पृथ्वी तच उरलेले ३ महाभूतं ( आकाश ,वायू ,तेज ) निहित असतात

निहित - स्थापित  ,inherent

षड गढूळ - म्हणजे षड रिपूंनी (काम क्रोध मध लोभ मोह मत्सर ) कलुषित

वृत्ती - quality, गुणधर्म -property

अजय सरदेसाई (मेघ )

मंगळवार ,०८/०३/२०२२

११:३० AM