उदक हे प्राण जाण , निराकार
निर्गुण
मृदा हे शरीर जिवाचे, त्रिगुण निहित
मृदा-उदक घर्षण करी तेज प्रगट
मृदेशी
संपर्क होता दिसे उदक षड गढूळ
वृत्ती
षड मृदेची , हा तिचाच धर्मगुण
उदक
निर्मळ सर्वथा असे सदा निर्गुण
सत्ता
षडाची विकट होता उदकाची होई वाफ
उदका
पासून विलग, उरते मृदा , निस्तेज, निष्प्राण
वरील
कवितेत शरीर आणि आत्मा ( म्हणजेच प्राण ) यांचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केले
आहे . प्राण किंवा आत्म्यास उदकाची सान्या दिली आहे व शरीराला पृथ्वीची
( मृदा ,माती )
उदक म्हणजे 'आप' पंच महाभूतांपैकी
एक पण या उदकताच (H₂O) प्राण वायू (
oxygen ) प्रतिष्ठापित आहे .
मृदा म्हणजे माती ( पृथ्वी
- पंचमहाभूतांपैकी एक ) या पृथ्वी तच उरलेले ३ महाभूतं ( आकाश ,वायू ,तेज ) निहित असतात
निहित
-
स्थापित
,inherent
षड
गढूळ
- म्हणजे षड रिपूंनी (काम क्रोध मध लोभ मोह मत्सर ) कलुषित
वृत्ती - quality, गुणधर्म -property
अजय सरदेसाई (मेघ
)
मंगळवार
,०८/०३/२०२२
११:३०
AM
No comments:
Post a Comment