Total Pageviews

Thursday, 30 April 2026

सप्तश्लोकी नरसिंह स्तुती



उग्रं नरसिंहं वन्दे मृत्युमृत्युं सनातनम्।
दुष्टेषु ज्वलद्‌वक्त्रं तं भक्तेषु भद्रदर्शनम्॥

दृष्टिर्दुरात्मदुष्टानां दहत्यग्निरिव क्षणात्।
सा एव प्रह्लादभक्तेषु सौम्या शीतांशुरिव शान्तिदा॥

तीक्ष्णदंष्ट्रनखास्तस्य दुष्टसंहारतत्पराः।
भक्तानां तु स एवाङ्गः कोमलः पुष्पसन्निभः॥

नमस्ते नरसिंहाय प्रह्लादहितकारिणे।
हिरण्यकशिपोर्वक्षोविदारणकराय ते॥

भक्तरक्षणदीक्षाय दुष्टसंहारकारिणे।
नमस्ते परमेशाय शरणं मे भवाच्युत॥

करावलम्बनं देहि लक्ष्मीनरसिंह प्रभो।
त्वमेव शरणं नाथ रक्ष मां करुणानिधे॥

चरणाम्भोजयुग्मे ते नत्वा भक्त्या समर्पितः।
मदीयं सर्वमेतत्ते त्वमेव शरणं मम॥

फलश्रुती:

इमां सप्तश्लोकीं नरसिंहस्य भक्तिभावेन यः पठेत्।
प्रातःकाले शुचिर्भूत्वा नरसिंहं समर्चयन्॥

तस्य भयं न विद्यते शत्रुतो व्याधितो न च।
ऐश्वर्यं पुत्रपौत्राश्च वर्धन्ते नात्र संशयः॥

संकटे महति प्राप्ते यः स्मरेन्नरकेसरिम्।
तत्क्षणान्मुच्यते सो ऽपि भक्तरक्षैकतत्परात्॥

गुरुवार, ३०/४/२०२६ , ३:२५ PM

वैशाख शुक्ल चतुर्दशी - श्री नरसिंह व देवी छिन्नमस्ता जयंती

अजय सरदेसाई -मेघ


मराठी अर्थ 

१.
मी त्या उग्र, सनातन नृसिंहाला नमस्कार करतो—
जो मृत्यूचाही मृत्यू आहे;
ज्याचे मुख दुष्टांसाठी अग्नीप्रमाणे ज्वलंत आहे,
पण भक्तांसाठी मंगल, शांत आणि कल्याणकारी आहे।

२.

त्याची दृष्टी दुरात्मा आणि दुष्टांना क्षणात अग्नीप्रमाणे जाळते;
पण तीच दृष्टी प्रह्लादसारख्या भक्तांसाठी
चंद्रासारखी शीतल, सौम्य आणि शांतिदायक ठरते।

३.

त्याचे तीक्ष्ण दात आणि धारदार नखे दुष्टांचा नाश करण्यासाठी तत्पर असतात;
पण भक्तांसाठी त्याच देहाचा स्पर्श फुलासारखा कोमल आणि प्रेमळ असतो।

४.

प्रह्लादाचे कल्याण करणाऱ्या नृसिंहाला नमस्कार;
हिरण्यकशिपूचा वध करून त्याचा छेद करणाऱ्या प्रभू, तुला वंदन।

५.

भक्तांचे रक्षण करण्याची दीक्षा घेतलेल्या आणि दुष्टांचा नाश करणाऱ्या परमेश्वरा,
हे अच्युत, मला तुझ्या शरण येऊ दे।

६.

हे लक्ष्मी-नृसिंह प्रभो, मला तुझा हात दे (आधार दे);
तूच माझा आश्रय आहेस—हे करुणामय नाथ, माझे रक्षण कर।

७.

तुझ्या चरणकमळांपाशी नम्रतेने वंदन करून,
मी माझे सर्वस्व तुला अर्पण करतो—
तूच माझे अंतिम शरण आहेस।


फलश्रुती (स्तोत्र पठणाचे फल):

जो मनुष्य ही सप्तश्लोकी स्तुती भक्तिभावाने,
प्रातःकाळी शुद्ध होऊन नृसिंहाची पूजा करत पठण करतो—
त्याला कोणत्याही शत्रूपासून, रोगापासून किंवा भयापासून त्रास होत नाही;
त्याच्या आयुष्यात ऐश्वर्य, तसेच पुत्र-पौत्रांची वृद्धी होते—यात शंका नाही।
मोठ्या संकटाच्या वेळी जो नृसिंह यांचे स्मरण करतो,
तो त्या क्षणीच संकटातून मुक्त होतो—
कारण प्रभू नृसिंह हे भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात।

Wednesday, 29 April 2026

अनुष्टुप्छन्दसि जगन्नाथकथा


 

🔸 मंगलचरण:

वन्दे गणेशम प्रथमम देवम विघ्ननाशनम विभावसम्।
लम्बोदरम गजाननम सिद्धिदम त्वम नमाम्यहम्॥
हंसवाहाम नमाम्यद्य सरस्वतीं शुभदाम शिवाम्।
वीणाहस्ताम वराम देवीं वाग्देवीं प्रणमाम्यहम्॥
बलभद्रम बलिनम वन्दे जगन्नाथम जगत्पतिम्।
सुभद्राम शुभदाम देवीम प्रणमामि पुनः पुनः॥

🔸 कथाप्रारम्भः
भक्तिभावसमायुक्ताम कथाम वक्ष्यामि सादरम्।
श्रद्धया शृणुत भक्ताः जगन्नाथस्य पावनीम्॥
पुरा नृपो महानासीदिन्द्रद्युम्नो महायशाः।
हरिभक्तिपरः श्रीमान् नित्यम ध्यायति माधवम्॥
नीलमाधवरूपम तम वनमध्ये ददर्श सः।
दृष्ट्वा तम परमम देवम हृष्टात्मा नृपोऽभवत्॥
तस्य रूपस्य पूजार्थं मन्दिरम कर्तुमुद्यतः।
देवसाहाय्यमिच्छन् स प्रार्थयामास भावतः॥
तदा आगाद् दिव्यशिल्पीक विश्वकर्मा वृद्धरूपधृतः स्वयम्।
उवाच नृपतिं तत्र वाक्यम गूढम सनातनम्॥
एकाकी कर्म करिष्ये न द्वारंट उद्घाटयेत्।
यावत्कर्म समाप्तम मे तावत् तिष्ठतु संयतः॥
दिनानि कतिचिद्याता निःशब्दम कर्म दृश्यते।
राजा चिन्ताकुलो भूत्वा द्वारमुद्घाटयत्तदा॥
उद्घाटिते तु तस्मिन् वै शिल्पी नोपलभ्यते।
अपूर्णम कर्म दृश्येत तत्र राज्ञो मनो व्यथम्॥
अपूर्णाः मूर्तयस्तत्र दृष्टा विस्मितचेतसा।
हस्तपादविहीनाश्च देवरूपाणि भावतः॥
तदाऽकाशे स्वरः दिव्यो वाणी प्रोक्ता गभीरया।
एषैव मम संकल्पो मा शोचस्व नरोत्तम॥
एवम रूपेण ते देवा भक्तानाम हृदि संस्थिताः।
न रूपेण परम पूर्णम भावेनैव तु लभ्यते॥
यत्र भक्तिर्दृढा नित्यम प्रेमरूपा निरन्तरा।
तत्र वसति नित्यम हि जगन्नाथो जगत्पतिः॥

🔸 फलश्रुतिः
इयम कथा पवित्रा या जगन्नाथप्रकीर्तिता।
श्रुत्वा भक्त्या पठित्वा च मोक्षम याति न संशयः॥

🌼 जगन्नाथकथा — मराठी भावांतर
 
🔸 मंगलाचरण

वंदितो गणराया तू, विघ्नांचा नाशक थोर।
लंबोदर गजानना, नमितो तुज वारंवार॥

हंसवाहिनी माते तू, सरस्वती शुभदायिनी।
वीणाधारी वाग्देवी, वंदितो तुज भक्तीनी॥

बलभद्रा बलशाली तू, जगन्नाथा जगत्पती।
सुभद्रे शुभदे माते, वंदितो तुम्हां पुनःपुन्हा॥

🔸 कथाप्रारंभ
भक्तिभावे सांगतो मी, कथा पावन मनोहर।
श्रद्धेने ऐका भाविक, जगन्नाथाची ही अमर॥
पूर्वी होता एक राजा, इंद्रद्युम्न महायशी।
हरिभक्तीत रंगलेला, माधवध्यानी अहर्निशी॥
नीलमाधव रूप त्याचे, वनामध्ये त्याने पाहिले।
त्या दर्शनाच्या क्षणातच, हृदय त्याचे भरून आले॥

🔸 मन्दिरनिर्माण
त्या रूपाची पूजा करण्यास, मंदिर बांधण्या उद्युक्त।
देवसाहाय्य मागत, प्रार्थना केली विनम्रयुक्त॥
विश्वकर्मा देव आला, वृद्धवेष धारण करून।
दिव्य शिल्पकार तो थोर, बोलला राजासमोर॥

🔸 शिल्पिनो नियम
“एकट्याने हे कार्य करीन, दार उघडू नकोस कधी।
जोवर पूर्ण होई काम, थांब संयमाने सदा॥”

🔸 राजाचा संदेह
काही दिवस उलटले तसे, शांत कार्य चालत होते।
राजा झाला चिंताग्रस्त, स्वरही नाही ऐकू येते॥
उतावळ्या मनाने त्याने, दार उघडले त्या क्षणी।
शिल्पकार नव्हता तेथे, काम राहिले अर्धवट धरणी॥

🔸 अपूर्ण मूर्ती
अपूर्ण मूर्ती दिसल्या तेथे, राजा झाला चकित।
हात-पाय नसलेल्या त्या, देवरूपे अद्भुत॥

🔸 आकाशवाणी
तेव्हा आकाशातून आली, वाणी दिव्य गंभीर।
“हीच माझी इच्छा आहे, सोड चिंता रे धीर॥”

🔸 तात्पर्य
अशा रूपाने हे देव, भक्तांच्या हृदयी वसती।
रूपात नाही पूर्णत्व, भावातूनच मिळते गती॥
जिथे भक्ती दृढ असते, प्रेमरूपा निरंतर।
तिथेच राहतो नित्य, जगन्नाथ जगदीश्वर॥

🔸 फलश्रुती
ही कथा पवित्र अशी, जगन्नाथाची कीर्तिमान।
भक्तिभावे वाचा-ऐका, मिळे निश्चित मोक्षदान॥


बुधवार, २९/४/२६ , ४:०० PM
अजय सरदेसाई -मेघ 

Thursday, 2 April 2026

कृपेचा निर्झर


तुझ्या कृपेच्या कथा ऐकल्या मी बहुत,
आज मीही अनुभवला स्पर्श तो अद्भुत।

शब्द माझे हरवले गहिवराच्या प्रवाहात,
कृतज्ञ अश्रू ओघळती शांत ह्या डोळ्यांत।

कसे फेडू दत्ता तुझ्या प्रेमाचे पांग,
करितो प्रार्थना—नित्य ठेवावा संग।

मनपटलावर निर्झरती तुझ्या कीर्तीचे उखाणे,
मन भरून येते आठवून तुझे तराणे।

तुच केली सरस्वती बहाल माझ्या शब्दांना,
केली लय प्रदान माझ्या कवितांना।

ठेव अशीच कृपा नित्य माझ्यावर,
मिळो कीर्ती नि भुक्ती मम कवितेवर।

बीज गीताचे रोवलेस तूच—तूच वृक्ष कर आता,
दत्ता, तव इच्छेविण दुज्या कुणाची काय गाथा।

‘मेघ’ जरी बरसतो धरेवर—जल कोठूनी आणतो?
बाष्प करून देते धरा—तेच तिला अर्पितो।

गुरुवार, २ एप्रिल २०२६ | १:३१ PM
अजय सरदेसाई ‘मेघ’

Wednesday, 1 April 2026

शब्दातीत




निखळले आकाश तारकांचे,
मी न मोजले तुकडे त्याचे।
क्षण होता एवढाच — जगण्याचा पूर्ण,
ना प्रश्न उरले, ना क्षण उत्तरांचे।

स्तब्ध सर्व — शरीर, मन नि विचार,
फक्त स्पंदन हृदयाचे — हाच व्यवहार।
एक सणक मुळातून सळसळली वर,
थेट सहस्राराशी भिडली सरसर।

हिच का ती गायत्री, कुंडलिनी झाली जागृत,
भंगले आकाश — का हिलाच भेटण्यास मूर्त?
कळेना काहीच — ना तो विचारही उत्स्फूर्त,
स्तब्ध सर्व — मी होतो साक्षी फक्त।

काहीच नव्हते — होती जाणीव फक्त,
तीही अक्षर नव्हे — क्षणीक,नाशिवंत।
अवर्णनीय उन्माद — त्या निमिषात होता,
शब्दातीत तो अनुभव कुणाचा होता?


— अजय सरदेसाई ‘मेघ’
बुधवार, १ एप्रिल २०२६ | १२:४५ दुपारी