Total Pageviews

Saturday, 13 July 2024

श्रीगुरु अष्टक


वल्लभेशास वनांत मारता तस्करांनी,श्रीपाद वनी प्रकटला

क्रोधीत होऊन त्रिशुळे मारिले, सोडून एक ,त्या सर्व तस्करा

भस्म लाववून घेतले वल्लभेशास,केले त्यास जिवीत पुन्हा

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला ।।१।।

 

पोटशूळाने त्रस्त ब्राम्हण गेला गंगेत जीव द्यावया

कृपाकरुन श्रीगरूंनी केले व्याधी मुक्त त्याला

पंगतीस बसवून आपल्या,जेवविला पोटभर त्याला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।२।।

 

संतोषोनी सायंदेवा अभयकर दिधला 

क्रूर यवनांस त्या उठविल्या, हृदयी ज्वाळा

पुनः भेटीचा आशीर्वाद सायन्देवास दिधला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।३।।

 

अमरापूर ग्रामी राहतसे एक गरीब ब्राम्हण भला

कर्ममार्गी आचरण होते ,रहाटे शुष्क भिक्षा मागुनी

उपटून घेवडा घरांतील,त्यास द्रव्याचा हंडा दिधला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।४।।

 

केले मुक्त विप्रस्त्रियेसी ब्रह्महत्या पताका  

दिले आशिष पुत्रांचे,दोन नारिकेलं देऊन तिजला

जिवीत केले पुन्हा जेव्हा पुत्र एक पंचतवे पावला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।५।। 

 

दोन विप्र अतिगर्विष्ट,वेद चर्चेस आव्हानीले त्रिविक्रमा

तयांचा गर्व मोडुनी ,पढविले वेद अंत्यजा मुखा एका

त्रिविक्रम शोभविला म्हणुनी केली त्या विप्रांसी शिक्षा

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।६।। 

 

गाणगापुरी श्रीगुरुस भेटण्या एक कुष्टी विप्र आला

शुष्क काष्ठास पल्लव आणुनी केला त्यास कुष्ठापासूनी वेगळा

नरहरी नामे त्या विप्रे,शीगुरुसी रचुनी नृसिंह अष्टक गौरविला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।७।।

 

कशी औदुंबर वाडीस राहुनी गाणगापुरी आला

ग्रामांसी या येऊनिया सर्व भक्तांचा उद्धार केला

वेळो वेळी भक्तांस धर्माचरणाचा उपदेश केला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।८।। 

 

'मेघ ' म्हणे हे अष्टक रचुनी ,मी गुरुमहिमा वर्णिला

सुधारस आकंठ पिऊनी,मी लोकांस ही वाटला

गाणगापुरी जो माझा कैवारी,त्यासी मी प्रार्थिला

तो हा सद्गुरू राज नरहरी औदुंबरी राहिला।।९।।

 

शनिवार  १३/०७/२०२४   ०२:५५ PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment