Total Pageviews

Wednesday, 27 August 2025

गणपती स्तुती


 

ओंकारा अक्षरा आद्यात्मजा
तुझे चरणी नमन माझे ।
गिरिजाम्मजा शिवसुता तुझे चरणी नमन माझे।
भक्तपालका विघ्नहरा तुझे चरणी नमन माझे।
गजवक्त्रा लंबोदरा तुझे चरणी नमन माझे।
मुलाधारस्तितया तेजोमया तुझे चरणी नमन माझे।
चोदा वाद्या चौसस्ट कला नायका तुझे चरणी नमन माझे।
देववंद्यं गणाधिपा तुझे चरणी नमन माझे।
सिंदुरवर्णा सुनयना तुझे चरणी नमन माझे।
मुषकध्वजा सुमनोहरा तुझे चरणी नमन माझे।
ऋद्धिसिद्धीनाथा मंगलाधिशा तुझे चरणी नमन माझे।
एकदंता मंगलचरणा तुझे चरणी नमन माझे।
विश्वनायका करुणालया तुझे चरणी नमन माझे।
परशुहस्ता पाशविमोचना तुझे चरणी नमन माझे।
गणपती वेदपरा तुझे चरणी नमन माझे।

नैदृव्य गोत्रस्य अजय शर्मा: रचित गणपती स्तुती संपुर्णं।


श्री महा गणपती अर्पणामस्तु शुभंम भवन्तु।

बुधवार २७/८/२५  ११:११ AM 
अजय सरदेसाई -मेघ 

*अर्थ:*
ओंकारा अक्षरा आद्यात्मजा तुझे चरणी नमन माझे।
➡ ओंकारस्वरूप, अक्षरांचा (शब्दांचा) अधिष्ठाता, आत्म्याचा जन्मदाता अशा तुला माझे वंदन आहे.
गिरिजाम्मजा शिवसुता तुझे चरणी नमन माझे।
➡ पार्वतीदेवीचा पुत्र, महादेवाचा लाडका असा तुला माझे वंदन.
भक्तपालका विघ्नहरा तुझे चरणी नमन माझे।
➡ भक्तांचा रक्षक, सर्व विघ्नांचा नाश करणारा – तुला माझे वंदन.
गजवक्त्रा लंबोदरा तुझे चरणी नमन माझे।
➡ हत्तीमुखी, मोठ्या पोटाचा (लंबोदर) – तुला माझे वंदन.
मुलाधास्तितया तेजोमया तुझे चरणी नमन माझे।
➡ मूलाधार चक्रात स्थित, तेजस्वी प्रकाशरूपा – तुला माझे वंदन.
चोदा वाद्या चौसस्ट कला नायका तुझे चरणी नमन माझे।
➡ चौदा विद्या व चौंसष्ट कला यांचा अधिपती – तुला माझे वंदन.
देववंद्यं गणाधिपा तुझे चरणी नमन माझे।
➡ देवांनाही वंदनीय, गणांचा अधिपती – तुला माझे वंदन.
सिंदुरवर्णा सुनयना तुझे चरणी नमन माझे।
➡ सिंदूरासारखा रक्तवर्णी, सुंदर डोळ्यांचा – तुला माझे वंदन.
मुषकध्वजा सुमनोहरा तुझे चरणी नमन माझे।
➡ मुषकवाहन, मनोहर रूप असणाऱ्या तुला माझे वंदन.
ऋद्धिसिद्धीनाथा मंगलाधिशा तुझे चरणी नमन माझे।
➡ रिद्धी-सिद्धींचा अधिपती, मंगलकार्यांचा स्वामी – तुला माझे वंदन.
एकदंता मंगलचरणा तुझे चरणी नमन माझे।
➡ एका सुळेचा, मंगलमय चरण असणारा – तुला माझे वंदन.
विश्वनायका करुणालया तुझे चरणी नमन माझे।
➡ विश्वाचा अधिपती, करुणेचा सागर – तुला माझे वंदन.
परशुहस्ता पाशविमोचना तुझे चरणी नमन माझे।
➡ परशु (कुठार) हातात धारण करणारा, पाशातून (बंधनातून) मुक्त करणारा – तुला माझे वंदन.
गणपती वेदपरा तुझे चरणी नमन माझे।
➡ वेदांचा अधिपती, वेदांचे स्वरूप असणाऱ्या तुला माझे वंदन.

---
समर्पण श्लोक
नैदृव्य गोत्रस्य अजय शर्मा: रचित गणपती स्तुती संपुर्णं।
श्री महा गणपती अर्पणामस्तु शुभंम भवन्तु॥
➡ “नैदृव्य गोत्रीय अजय शर्मा (मेघ) यांनी रचलेली ही गणपती स्तुती येथे समाप्त झाली.
ही श्री महागणपतीला अर्पण आहे.
यामुळे शुभत्व लाभो.”

🌸🪔🙏🪔🌸

No comments:

Post a Comment