त्रिगुणाकारं
त्रिगुणरहितं योगीभिरनगम्यं।
वन्दे सर्वव्यापों शुभांगं सर्वलोकैकनाथं॥ १ ॥
मंगलाकारं अमंगल्हारं आनंदमयीं गोत्रिणं।
सर्वोपांगीं वेदोस्तीतमिशं त्वं गोप्यं॥ २ ॥
सर्वात्मकं सर्वानुभवं श्रेष्ठत्वं नित्यं।
त्वं सर्वाकारं सर्वाधिष्ठितं ब्रम्ह अवार्चनम्॥ ३ ॥
त्वं यद्यपि सर्वगतः निराकारोऽसि सनातनः।
तथापि त्वां करुणामयं दयाघनस्वरूपमेव पश्यामि॥ ४ ॥
दयाघनं मृदुहासमनोहरं च स्वभावमयं शुभम्।
एतदेव तव स्वरूपं मेघस्य मानसवाञ्छितं रूपम्॥ ५ ॥
शनिवार,३०/८/२५,११:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ
श्लोक १
मी त्या परमात्म्यास वंदन करतो जो त्रिगुणात्मक दिसतो पण प्रत्यक्षात गुणरहित आहे; योगींनाही ज्याला गाठता येत नाही; जो सर्वव्यापी, शुभरूप आणि सर्व लोकांचा एकमेव नाथ आहे.
श्लोक २
तू मंगलस्वरूप आहेस, अमंगल नष्ट करणारा, आनंदमय, सृष्टीचे मूळ (गोत्रिणं) आहेस. तुझे स्वरूप वेदांनाही पार करता येत नाही. तूच ईश्वर आहेस — परंतु गूढ व गोपनीय.
श्लोक ३
तूच सर्वांचा आत्मा, सर्व अनुभवांचा अधिष्ठान आणि नित्य श्रेष्ठ आहेस. सर्व रूपांमध्ये प्रकट होऊनही तू त्यांचा आधार आहेस. तेच अव्यक्त ब्रह्म तूच आहेस — जे मानवी अर्चनेच्या पलीकडे आहे.
श्लोक ४
तू सर्वत्र व्यापलेला, निराकार आणि सनातन असूनही, माझ्या भक्तदृष्टीला मात्र तू करुणामय, दयाघन स्वरूपातच प्रकट होतोस.
श्लोक ५
दयामेघस्वरूप, कोमल हास्याने मनाला मोहविणारे, स्वभावत: शुभ असे हेच तुझे स्वरूप — आणि तेच माझे, "मेघ" या कवीचे, मनोवाञ्छित रूप आहे.

Very nice especially with the meaning in Marathi
ReplyDelete