भगवंतासी भजावे भक्ती करोनी ।
पुजा पाठ याला
तो ना पुसेची ।।
भक्ती करावी
ठेवून सर्वांठायी एक भाव ।
उच्च निच जाती
तेथे नाही ।।
भगवंतासी पहावे
सर्वां ठायी ।
येरव्ही तो
कुणासही न दिसे ।।
एकनाथां घरी
राहीला तो जगन्नाथ ।
म्हणे त्याला
श्रीखंड्या तो एकनाथ ।।
एकनाथ क्षण
एक अडकले भाह्यांत ।
तिथे तुझी
माझी गत काय असे ।।
🙏♥️🙏
या कली युगांत, परमेश्वराला ओळखणे महा कठीण आहे. त्याला या मर्त्य लोकांत पहायचे असल्यास आपल्याला आपल्या कल्पनेतील स्वरुपाला पहीली तिलांजली द्यायला हवी. म्हणजे त्या परमेश्वराला एका साच्यात बसवून ठेवता नये.आपण परमेश्वराला आपापल्या कल्पनेतुन एका मर्यादित स्वरुपात अडकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तो अमर्याद आहे. म्हणून त्याला सर्वां ठायी पहावे आणि सर्व रुपे ही त्याचीच आहेत हे लक्षात घ्यावे.
हे मी जे सांगत आहे ते सांगणे जरी खुप सोपे असले तरी ते अंगवळणी पडणे तितकेच कठीण आहे. जेथे एकनाथ महाराजांना १२ वर्ष ओळखता आले नाही तिथे आपली काय गाथा.
रामकृष्ण हरी 🙏
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment