Total Pageviews

Saturday, 18 January 2025

करा हो माझा सांभाळ


सकळ ब्रम्हांडावरी स्वामी तुमचा ची असे अंमळ
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
कली युगाची काळी रात्र चालली,  पसरला  सर्वत्र पापाचा अंधकार 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ 

षड्रिपु गांजु पाहती मज विणुनी माया जाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
लक्ष अमिषे खुणावती मज, लक्ष त्यांचे जंजाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
इच्छा झाल्या लेकुरवाळ्या,न तुटेची त्यांची नाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ

या काळ रात्रीचा अंमळ तोडा, उगवु द्या सोनेरी सकाळ 
पाया लागुनी विनवितो "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
शुक्रवार, १७/१/२०२५ , ११:४८ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)

Wednesday, 15 January 2025

उरलो न मी,नुरली माया


दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ,गळला अभिमान

आता दत्त नाम जेथे, तेथे मिळे समाधान

 

दत्त लिलेचे कोणास न ये अनुमान

एका जनार्दनी तोची श्री दत्त जाण

 

दत्त येऊनीया सामोरा उभा ठाकला

लोटांगण घालुनी मी प्रणिपात केला

 

प्रेमे बाहु धरुन मज दत्ताने उठविला

धरुनी हात माझा कैवल्य वाटेने नेला

 

म्हणे "मेघ" आता कोणाच्या पडु मी पाया

सर्वत्र दत्त ची व्यापले,उरलो मी,नुरली माया

 

बुधवार, दिनांक १५//२०२५

१८:५३ hrs.

अजय सरदेसाई (मेघ)


Tuesday, 7 January 2025

गुरुमहाराज क्षमा याचना


गुरु महाराज द्या हो क्षमा या अपराध्याला 

चूकलो मी पुन्हा,भुललो नको त्या अमिषाला

 

कितीदा माऊली दाविली तुम्हीच सरळ वाट

तरी हिरण्यमृगास भुलून शिरलो मी अरण्यांत दाट

 

मिथ्या मागे लागलो, हरपून माझे भान

क्षणात विसरलो श्री गुरु तुमची शिकवण

 

हिरण्यमृग नव्हे ते होते मायाजाळ

क्षणात विरले,ठाकला पहा समोर काळ 

 

अंधार दाटला सर्वत्र,काळ घट्ट आवळतो मजवर पाश

धावा वाचवा श्रीपादा,आळवितो कळकळीने तुम्हास हा दास

 

तुम्ही स्मर्तगामी,ऐकाल हाक,मज एकची वाश्वास

या हो लवकर श्रीपादा,लागला तव कृपेचा ध्यास

 

अरण्यांत अडकलो जरी तरी बाधो अघ लेश

नाम तुझे मुखी येता उरो पापाचा लवलेश

 

अर्पितो तव चरणी संसाराहीत हा भार

गुरुराया करा हो सर्व संकटांचा परिहार

 

 

श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये 🙏 🪔 🙏

 

मंगळवार, //२५ , १९:३३ hrs.

अजय सरदेसाई (मेघ)