Total Pageviews

Saturday, 18 January 2025

करा हो माझा सांभाळ

सकळ ब्रम्हांडावरी स्वामी तुमचा ची असे अंमळ
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
कली युगाची काळी रात्र चालली,  पसरला  सर्वत्र पापाचा अंधकार 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ 

षड्रिपु गांजु पाहती मज विणुनी माया जाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
लक्ष अमिषे खुणावती मज, लक्ष त्यांचे जंजाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
इच्छा झाल्या लेकुरवाळ्या,न तुटेची त्यांची नाळ 
विनवितो दास "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ

या काळ रात्रीचा अंमळ तोडा, उगवु द्या सोनेरी सकाळ 
पाया लागुनी विनवितो "मेघ" तुम्हासी करा हो माझा सांभाळ
 
शुक्रवार, १७/१/२०२५ , ११:४८ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment