गुरु महाराज द्या हो क्षमा या अपराध्याला
चूकलो मी पुन्हा,भुललो नको त्या अमिषाला
कितीदा माऊली दाविली तुम्हीच सरळ वाट
तरी हिरण्यमृगास भुलून शिरलो मी अरण्यांत दाट
मिथ्या मागे लागलो, हरपून माझे भान
क्षणात विसरलो श्री गुरु तुमची शिकवण
हिरण्यमृग नव्हे ते होते मायाजाळ
क्षणात विरले,ठाकला पहा समोर काळ
अंधार दाटला सर्वत्र,काळ घट्ट आवळतो मजवर पाश
धावा वाचवा श्रीपादा,आळवितो कळकळीने तुम्हास हा दास
तुम्ही स्मर्तगामी,ऐकाल हाक,मज एकची वाश्वास
या हो लवकर श्रीपादा,लागला तव कृपेचा ध्यास
अरण्यांत अडकलो जरी तरी बाधो अघ लेश
नाम तुझे मुखी येता उरो न पापाचा लवलेश
अर्पितो तव चरणी संसाराहीत हा भार
गुरुराया करा हो सर्व संकटांचा परिहार
श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये 🙏 🪔 🙏
मंगळवार, ७/१/२५ , १९:३३ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment