दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ,गळला अभिमान
आता
दत्त नाम जेथे, तेथे मिळे समाधान
दत्त लिलेचे कोणास न ये अनुमान
एका जनार्दनी तोची श्री दत्त जाण
दत्त येऊनीया सामोरा उभा ठाकला
लोटांगण घालुनी मी प्रणिपात केला
प्रेमे बाहु धरुन मज दत्ताने उठविला
धरुनी हात माझा कैवल्य वाटेने नेला
म्हणे "मेघ" आता कोणाच्या पडु मी पाया
सर्वत्र
दत्त ची व्यापले,उरलो न मी,नुरली माया
बुधवार, दिनांक १५/१/२०२५
१८:५३ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment