नित्य मनी श्रीगुरु ध्यास,
नेती संकल्प पूर्णत्वास।
मी अडाणी गांजलो या लौकीकास,
प्रकाशा मनीच्या तिमीरास॥१॥
उभारीस धरावी सत्संगाची कास,
मन:शांतीस करावी नामा-ची रास।
मनी धरावी गुरु-गोविंदाची आस,
अहंवृत्ती होती त्वरित भस्मसात॥२॥
चंचल मन हे फिरे दश दिशांस,
गुरु-नामे बांधू लगाम मनास।
स्वर हरिपाठाचा राहो मुखवरी,
बाकी सर्व पाहील तो श्रीहरी॥३॥
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment