मन घरटे जिवाचे,
रहातात पक्षी दोन.
एक श्रद्धाळू साधक,
दुसरे वात्रट बेणं.
विचारु कोणास सांग,
मन कोणाचे ऐकेल?
धनी कोण, हे ठरवणार,
रात्रंदिन विचारते मन.
विचारांचे वादळ उठे,
हलते घरटे जिवाचे.
ओढून खेचते एक,
दुसरे धरुनी ठेवते.
साधक म्हणतो थांब रे,
पाह आधी निज अंतर.
शांत हो आता निवांत,
तेव्हा धनी भेट अंती.
वात्रट स्थिर होऊन राहे,
घरट्यात एकच शांत ठाट.
दोघे पक्षी झाले एक,
झाली जिवा शिवाची गाठ.
सोमवार, ८/९/२५ , १०:४९ AM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment