धृपद:
भय-क्लेशांतून मुक्त करा दिनकरा ।
जाळा कर्म-विघ्नांचा पाष ॥
अंतरा १:
तुम्हा विण कोण त्राता ताता ।
करा दया करुणा श्रीपादा ।
मी धरली तुमची आस ॥
अंतरा २:
सूक्ष्म रूपे संचरसी निश्चती ।
जेथे तुझे चरित्र नित्य पठती ।
भक्ताचा हा विश्वास ॥
अंतरा ३:
पिठापुरी अन् कृष्णा तटी ।
सदा असशी ठेवुनी कृपादृष्टी।
ना इथे ठाव काळास ॥
अंतरा ४:
श्वासोश्वासी गुंजो नाम ।
तुझ्याविण नाही मज काम ।
सोडव हृदयाचा तमो-वास ॥
अंतरा ५:
दोष माझेक्षमा करिता ।
करा दया करुणा सर्वथा ।
पाहुनी चरण उरी विश्वास ॥
अंतरा ६:
तुझ्याविण माझे कोणी नाही ।
तुझ्या नामे सुख शांती राही ।
दे मनी नित्य भक्ति प्रकाश ॥
अंतरा ७:
तू परात्पर आमचा स्वामी ।
स्मरताच धावसी तू स्मृतगामी।
श्रीदत्ता जिव तुमचा दास।।
तुम्हा विण कोण त्राता ताता ।
करा दया करुणा श्रीपादा ।
मी धरली तुमची आस ॥
अंतरा २:
सूक्ष्म रूपे संचरसी निश्चती ।
जेथे तुझे चरित्र नित्य पठती ।
भक्ताचा हा विश्वास ॥
अंतरा ३:
पिठापुरी अन् कृष्णा तटी ।
सदा असशी ठेवुनी कृपादृष्टी।
ना इथे ठाव काळास ॥
अंतरा ४:
श्वासोश्वासी गुंजो नाम ।
तुझ्याविण नाही मज काम ।
सोडव हृदयाचा तमो-वास ॥
अंतरा ५:
दोष माझेक्षमा करिता ।
करा दया करुणा सर्वथा ।
पाहुनी चरण उरी विश्वास ॥
अंतरा ६:
तुझ्याविण माझे कोणी नाही ।
तुझ्या नामे सुख शांती राही ।
दे मनी नित्य भक्ति प्रकाश ॥
अंतरा ७:
तू परात्पर आमचा स्वामी ।
स्मरताच धावसी तू स्मृतगामी।
श्रीदत्ता जिव तुमचा दास।।
धृपद:
भय-क्लेशांतून मुक्त करा दिनकरा ।
जाळा कर्म-विघ्नांचा पाष ॥
बुधवार, १७/९/२५ , ११:४७ AM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment