Total Pageviews

Sunday, 3 August 2025

तव भक्तीचा नंदादीप


तुझे नी माझे सनातन ऋणानुबंध,

तुझ्या कृपेचा माझ्या भक्तीशी संबंध.


आता सरले सर्व आयुष्यातले रणकंद,

तव कृपाछायेत मन झाले शांतकुंद.


तू आहेस जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी,

तू जिथे जिथे , मीही त्या त्या ठिकाणी.


तव चरण हे सदा माझे आश्रयस्थान,

मम हृदय सर्वदा स्वामी तुझेच आसन.


हे गुरुवर वरप्रदा, रहा सदा माझ्या समीप,

मम मनात तेवत राहो तव भक्तीचा नंदादीप.

 

रविवार, ३/८/२५ , ०८:०० PM

अजय सरदेसाई -मेघ