जन्मों जन्मी जे पाय धरिले ते कुठे सोडुन जाऊ ।
तुझ्या चरणी करु दुःख रिते सर्व ,मोकळे होऊन राहु ।।
मायेत फसुन जन्मोजन्मी मी सोडली तुझी साथ ।
तरीही तु जन्म-जन्मांतरी न सोडला माझा हाथ।।
नृपेक्षेने सदा तुझे कृपाळा मज देतच आहेत हाथ ।
मी मुढ नी दांभिक असुन,असे काय पाहिले माझ्यात ।।
संकट समयी उभा राहशी तु ढाल बनुन।
दोन घास सदा भरवशी तु आई होऊन।।
सांगा सदगुरौं काय ही लिला काय माझी पुण्याई।
जन्मो-जन्मी या तुझ्या कृपेचा होऊ कसा उतराई ।।
रविवार,५/११/२०२३ ,११:४० AM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment