Total Pageviews

Wednesday 30 April 2014

श्रद्धा आणी तिचे महत्व






अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं यत I
असदित्युच्यते पार्थ तत्प्रेत्य नो इह II  . गि . १७-२८
 


हे पार्थ , अश्रद्धेने केलेले हवन ,दिलेले दान , आचरलेले तप केलेले जे कर्म असेल त्याला सत असे म्हणतात . हे सत या लोकी परलोकीही लाभदायक नाही . म्हणून भगवंताला अर्पण करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे .

खूप पूर्वी एकदा भारतात मोठा दुष्काळ पडला होता . एक गाव जे पूर्णपणे शेतीवरच निर्भर होते ते ह्या दुष्काळाच्या कचाट्यात खूप  वाईट सापडले.पावसा अभावी नद्या ,नाले , झरे , विहिरी  सुकल्या  , जमीन कोरडी पडली . अन्न नाही , पाणी नाही , प्राण्यांना द्यायला गवत नाही अशी परिस्तिति.  त्यात वरून सूर्याचे खालून जमिनीचे रणरणत्या निखार्यागत चटके. हळू हळू प्राणी लोकं मारू लागले.पाण्याच्या एका थेंबा साठी एका अन्नाच्या घासासाठी चोर्या दरोडे पडू लागले. गावची लोकं बिचारी हवालदिल झालेली .
शेवटी गावच्या जाणत्या लोकांनी गावातील देवळाच्या पुजार्याला विनंती केली दुष्काळ जाण्यासाठी आणि वर्षा वृष्टी होण्यासाठी काहीतरी दैवी उपचार करावे . पुजारी ब्राम्हणाने सांगितले कि उद्या सर्व गावकर्यांनी मंदिराच्या प्रांगणात जमावे . आपण सर्व मिळून परमेश्वराची प्रार्थना करूयात , पाउस नक्की पडेल व दुष्काळ मिटेल .
दुसऱ्या  दिवशी सांगितल्या प्रमाणे सगळे गावकरी देवळाच्या प्रांगणात जमले .एक गरीब गावकरी जो जरा उशिरा पोचला होता त्याचाकडे सर्व अचंब्याने पाहू लागले . जणू काही विचित्र देखावा पाहावा तसे . त्या गावकर्याने सोबत छत्री आणलेली होती .रणरणत्या उन्हात , पाउसचे एक हि चिन्ह किंवा ढग नसताना ह्या वेड्याने छत्री आणली हे पाहून सर्व गावकरी हसून जणू त्याची टर खेचू लागले .दृश्य होते हि मोठे विचित्र .पाउस नाही , पाउसाचा थेंब नाही आणि हा आपला आला छत्री घेऊन ! असो .
प्रार्थनेचा कार्यक्रम यथासांग पार पडला सर्व आपापल्या घरी जाण्यास निघाले.कुतूहलाने कुत्सित पणे काही लोकांनी त्याला छत्री आणल्या बद्दल विचारले .
"आर  वेड्या , पाउसाचा मौसम नाई , पाउसचे चिन्ह कुणीकडे दिसत नाई , आणि तुरे मारे छत्री घेऊन आलास . कश्या पाई ?
तो गावकरी म्हणाला  " लोकांनु , देव देतो नि देवच घेतो . मला खात्री हाय कि देव आपली प्रार्थना ऐकेल आनी मोप पाउस पडल , देवाच्या करणीने दुष्काळ मिटल ."
लोकं त्याच्यावर हसायला लागले, त्याला वेडाऊ लागले  , त्यांना दिसत होते ते रणरणते उन जे आजूनही अंगाला चटके देत होते .त्याची श्रद्धा विश्वास कोणालाही दिसत नव्हता .
आणी अचानक , अघटीत घडले ...
सुसाट वारा वाहू लागला , काळे ढग जमू लागले , वीज कडाडली आणी धोधो पाउस पडू लागला . सर्व गावकरी विस्मयीत झाले , त्यांच्या कुत्सित नजरा पाणावल्या . त्यांचे डोळे उघडले .त्यांनी मान्य केले कि त्या एकट्या गावकर्याच्या भक्ती पूर्ण श्रद्धेने केलेल्या प्रार्थने मुळेच पाउस पडला . बाकी सर्व गावकरी फक्त नावाला जमले होते .

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात कि प्रत्येक कर्मात श्रद्धा असणे आवश्यक आहे .अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म फलत नाही . ना या लोकांत ना परलोकांत

No comments:

Post a Comment