Total Pageviews

21,658

Monday, 3 July 2023

सदगुरु इतकाच करा उपकार

 


मज नोहे कोण गती

मी असे हो मुढ मती

न जाणो मी कैसी असे भक्ती

सांग केवी करु तुझी  स्तुती


तु असे स्वरुप दया घन

ऐकिले मी सज्जन मुखे करुन

आशा जागृती झाली माझे मन

म्हणुन धरीले तुझे चरण


मुढावर करा इतकाच उपकार

सद्गुरू कराहो माझा स्वीकार 

देवुन तव चरणांचा आधार

सुखी करा या मुढा जन्मो जन्मी 


सोमवार ,  गुरु पौर्णिमा 

दिनांक: ३/७/२०२३

११:५१ AM


अजय सरदेसाई 'मेघ'

No comments:

Post a Comment