Total Pageviews

Friday 6 September 2024

तू ब्रम्हांड स्वामी


लोक म्हणती गुरुनाथ तू ब्रम्हांड स्वामी

स्मरता ची धाऊन येसी ऐसा स्मर्त गामी

काय खरे मज न कळे

 

तुझे नाम घेऊन तिष्ठलो तरी मी दुखाने वेष्ठिलो

स्वामी श्रीये अभावी बहू मी कष्टलो

पळ पळ ,दिनो दिन

 

लोक म्हणताती म्हणे असे तुझे वचन

जे लोक वर्णिती तुझी कीर्ती गाऊन 

म्हणे सत्य तू त्यांवरी सुप्रसन्न होशी

 

मी केली तुझी भक्ती हे स्मरुन

तु देशील श्रीया,सुख समाधान

हे का न झाले गुरुनाथा अजुन

 

दशा झाली माझी दिनाहुन दिन

गुरुनाथा कोठे गेले रे तुझे वचन

सांग आता मज लागी

 

तु असता समर्थ जाण ,न करशी माझे कल्याण

सांग आता हा कोणता तुझा विनोद नारायण

सांग आधी मज लागी

 

कि तु असे माहा शक्तीमान

म्हणुन वेठीस धरले माझे प्राण

सांग आधी मज लागी

 

दाखवाया तुझी शक्ती महान

गांजतो का मज तू या कारण

सांग समर्था मज लागी

 

कि तु नाहीसच इथे वर्तमान

मी उगाची करतो तुझे स्मरण

अविवेक तो माझा

 

न कळे गुरुनाथा तुझे मन ,मी बालक अजाण

का मज सोडवी न तू स्वामी या घोर संकटातून

सांगा श्री गुरुनाथा किं कारणं

 

गजराजाने तव आळविता त्या तुम्ही सोडविले

माझी हाक ऐकुन ही का तुमचे हृदय न द्रवले

सांगा श्री गुरुनाथा किं कारणं

 

ही हाक माझी तुजला शेवटची जाण

न आल्यास, तू नाहीस ही मी मानीन खूण

सांगतो मी तुज हे निक्षून

 

नास्तिक होऊनी मी जिवन कंठीन

गुरुदेव खोटे तुझे वचन मी म्हणिन

निग्रहाने मी हे ओरडहून जगास सांगीन

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 


शुक्रवार   ०६/०९/२०२४   १३:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment