तो बरसला मजवर संतत धार कृपा घन
भक्तीच्या अंकुराने फुलले रे अंतर मन
भक्ती ची वेल उंच झेपाविली गगनासी
परीमळ फुलांचा पसलला आकाशी
अगणित भृंग आले मधु चाखावया
वाचेने कशी वर्णु ही लिला सद्गुरू राया
भक्ती चा मकरंद सर्वांनी केला प्राशन
द्वैत सर्व मिटले तात्काळ
आता सुखे चालले अद्वैत संभाषण
वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा चे संपले वाचतुष्टय
हे हृदयी चे ते हृदयी झाले आपिष्ट्य
गुरुवार, १३/२/२०२५ , ११:३३ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)
*गुरु प्रतिपदेच्या सदिच्छा*