हम अगर अपने घर में न मिलें, तो तन्हाइयों से पूछो,
My thoughts on Spirituality , Vedant and us & its different aspects related to us .
Total Pageviews
Monday, 22 June 2026
हम अगर अपने घर में ना मिले
हम अगर अपने घर में न मिलें, तो तन्हाइयों से पूछो,
Tuesday, 9 June 2026
साद वेणूची ( कृष्ण गोपी संवाद)
का घालते साद मज वेणू बावळी?
कधी रे पाजू माझ्या बाळास पान्हा?
दोन्हीकडे जीव, झाली मी वेडी.
कसा विभागू जीव सांग गोपाळ?
का दिलीस रे मज ही सूरतृष्णा?
हसला कान्हा वेणू ओठी धरुनी,
का ग अडकलीस अशी संभ्रमुनी?
सांग मग प्रेमामध्ये भेद कुठे राहे?
तेथेच माझे यमुनाजल भरे.
शोध मला तू प्रेमाच्या लाटांत.
मीच येईन तुझ्या घरी हसून.
तेथेच ग माझे खरे स्वरूप.
ऐकून वाणी मुरलीधराची,
विरली व्यथा त्या गोपीकेची.
दिसला गोपाळ तिच्या नेत्री अवखळ.
नाद उठला तिच्याच अंतरीत.
वृंदावन फुलले तिच्या मनी.
मंगळवार, ९/६/२०२६ , १०:३० PM
अजय सरदेसाई -मेघ
सुर येती.... , विरुन जाती... .
Wednesday, 3 June 2026
तू माझ्या सोबत उभा रे
ध्रुवपद
कृपेचा हात तुझा मस्तकी, कृपादृष्टी माझ्यावरी,
भवसागर हा मी तरलो रे।
वादळे जरी घोंघावली, लाटा जरी उसळल्या भारी,
नाव माझी तुझ्यामुळे तरली रे।
डगमगली जरी ही नैया, भीती न मनी कणभर रे,
नावाडी माझ्या जीवाचा तू, माझ्या सोबत उभा रे॥
१
काळोख दाटून येता, वीजा नभी कडाडता,
तारे लपती मेघांच्या आड रे।
दिशाही हरवून जाता, वाटा धूसर होत जाता,
भरकटले मन दाही दिशांना रे।
अंतरी तुझी ज्योत जळे, मार्ग नवा उजळे,
दीप होऊन जीवनाचा तू, माझ्या सोबत उभा रे॥
२
थकले जरी हे पाय माझे, मोडले जरी बेत सारे,
श्वास वाटे ओझे जड रे।
अश्रू दाटती लोचनी, शब्द अडकती कंठी,
क्षणभर वाटे संपले सारे, हरपला धीर रे।
नाव तुझे ओठी येता, शक्ती पुन्हा उभी राहते रे,
हात धरुनी चालविणारा तू, माझ्या सोबत उभा रे॥
३
काटे जरी या वाटेवरती, हसत हसत मी चालीन रे,
तुझ्या स्पर्शे दुःखातून उमलती सुंदर फुले रे।
मृत्यूची ना भीती उरे, जीवनाची सर्व चिंता सरे,
जेव्हा तुझे छत्र माझ्या मस्तकी रे।
जन्मोजन्मीचे हे नाते, कधी न तुटे, कधी न विखुरे,
नाथ माझ्या प्राणांचा तू, माझ्या सोबत उभा रे॥
४
आता न काही मागणे, न उरली दुसरी कामना रे,
चरणी तुझ्या माथा मी टेकतो रे।
तन जरी हे माती व्हावे, मन जरी हे विरून जावे,
हात तुझा न सुटावा कधीच रे।
शेवटच्या त्या श्वासापर्यंत, एकच राहो माझा मंत्र,
सर्वस्व माझे तूच रे, तूच माझ्या सोबत उभा रे॥
बुधवार, ३/६/२०२६, १०:१० PM
अजय सरदेसाई — मेघ
मेरे साथ खड़ा
भवसागर से मैं तरा।
सनसनाए गरजे पवन, या घनघोर बरसें घन,
सागर की लहरें चाहे खौल उठें।
डगमगाए नैया मेरी, पर भय न मुझको ज़रा,
खेवट मेरी नाव का तू, मेरे साथ खड़ा।
अँधेरी रात घिर आए, या बिजली कड़क जाए,
तारे भी छुप जाएँ बादलों में।
दिशाएँ भटक जाएँ, राहें मिट जाएँ,
खो जाऊँ मैं अनजान जंगलों में।
तेरी ज्योति जले भीतर, मिले राह सुझरा,
दीपक मेरे मन का तू, मेरे साथ खड़ा।
जब थके हैं पाँव मेरे, टूटे हैं इरादे,
बोझ लगे साँसों का भी भारी।
आँसू पलकों पर रुके, शब्द होंठों पर झुके,
हार मान लूँ मैं, ऐसी आई बारी।
तेरा नाम लिया बस, मिली शक्ति दोबारा,
थामे बाँह जो मेरी तू, मेरे साथ खड़ा।
काँटे चुभें जो राह में, सह जाऊँ हँसकर,
ज़हर भी अमृत बने तेरे स्पर्श से।
न मृत्यु से भय लगे, न जीवन से डर,
जब तेरा आसरा है, क्या फ़िक्र किसी की।
जन्मों का बंधन यह, न टूटे न बिखरे,
नाथ मेरे जीवन का तू, मेरे साथ खड़ा।
अब न माँगूँ कुछ और मैं, न कोई आस रखूँ,
बस तेरी शरण में यह सिर झुका।
तन मिट जाए चाहे, मन बिखर जाए,
पर तेरा दामन न छूटे, यही एक दुआ।
जीते जी, मरते दम, यही है पुकारा,
सर्वस्व मेरा तू, मेरे साथ खड़ा।
Sunday, 24 May 2026
वाडीची पहाट
दर्शन तृष्णा
ध्यास आता लागला तव दर्शनाचा।।
ऐकीली श्रोत्री देवा इतकी तुझी ख्याती,
ध्यास माझ्या दृष्टीस तुला पहाण्याचा।।
मन माझे झाले चकोर, डोळे भावविभोर,
तृष्णा मिटूदे, वाहुदे झरा दर्शनामृताचा।।
सज्जनांची वाणी म्हणे तुज स्मर्तगामी,
मग का पाहसी रे अंत तू या भक्ताचा।।
'मेघ' विनवितसे आता, कळकळीने ताता,
आणिक नको उशीर, ये वेगे धावून आता।।
मन माझे बहु क्लांत,निजो दे मज निशंक शांत,
कुशीत तुझीया, माऊली ये बिगी बिगी आता।।
Saturday, 23 May 2026
निरांजन
पंचप्राणांचे तैल ओतून भावे केले निरांजन।।
श्वासांच्या मंदिरात, अंतर्यामाच्या गाभाऱ्यात
ओवाळीते आरती माझे मन।।
भावफुलांच्या ओंजळीने अर्पितो मी प्राण,
तुझ्या नामस्मरणी हरपले सारे भान।।
नयनी तुझी मूर्ती, ओठी अखंड गान,
चरणी विलीन झाले माझे स्वज्ञान।।
निस्पृह मनात उमटली निळाई ध्यानात,
शून्यात त्या विरले माझ्या अस्तित्वाचे संकेत।।
मावळल्या आरत्या, विरले अंतःकरण,
उरले ना मीपण, ना देहाचे बंधन।।
निःशब्द त्या क्षणी स्थिरले काळाचे स्पंदन,
शून्याच्या आरपार झाले तुझेच दर्शन।।
शनिवार, २३/५/२०२६ , ८:४९ PM
अजय सरदेसाई -मेघ
Wednesday, 20 May 2026
स्वरुप तुझे
ब्रह्मांडाच्या पुढेही तू दशांगुळे उरून आहे।।
चंद्र, सूर्य, तारे सार्यांत तेज तूच आहेस,
कणाकणांत या सृष्टीत तुझेच स्पंदन भरून आहे।।
दिशा-दिशांतून वाहे तुझ्या अस्तित्वाची चाहूल,
नाद ओंकाराचा अंतर्यामी झिरपून आहे।।
शून्यातून जन्म घेती अनंत विश्वांचे मेळे,
त्यात तुझे मौनही शब्दांहूनही बोलके आहे।।
काळाच्या पल्याडही तुझेच अधिराज्य अखंड,
क्षणभंगुर या जीवनात सत्य तुझेच भरून आहे।।
मीपणाच्या भिंती सार्या विरघळती तुझ्या स्मरणे,
प्रत्येक थेंब अस्तित्वाचा तुझ्यातच विरून आहे।।
मंगळवार,२०/५/२६ , ११:४० PM
अजय सरदेसाई -मेघ
तू आहेस जवळी
मंगळवार, २०/५/२६ , ११:११ PM
अजय सरदेसाई -मेघ
।। हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
अजय सरदेसाई -मेघ
Tuesday, 19 May 2026
स्वामी समर्थ प्रार्थना
Saturday, 16 May 2026
श्री शैनैश्चर प्रार्थना
शनिवार,१५/५/२६ ,११:४० AM
शनि अमावास्या,शनि जयंती निमित्त श्री शैनैश्चर चरणी अर्पण .
अजय सरदेसाई -मेघ
Tuesday, 12 May 2026
किती जंन्मांचा फेरा बाकी...
हा प्रश्न का घुमतो अक्षर माझ्या सुप्त मनात।।
न दिसशी तरीही अस्तित्व तुझे प्रत्येक क्षणात,
जाणवते तुझे स्पंदन रंध्रा-रंध्रात, हृदयाच्या कंपनात॥
मिटता डोळे जाणवतोस तू श्वासांच्या लयीत,
उघडता नेत्र हरवून जातोस दृश्यांच्या गर्दीत।।
वाळू निसटून जावी तसा निसटतोस तू,
तरी बिलगून असतोस तू माझ्या आभासात।।
प्राण कासावीस माझे मन माझे बेचैन रे,
चकोरासम तृषा वाढते, पिण्यास कैवल्य चांदणे रे।।
तु आहेस सर्वत्र जरी मला कधी भेटशील का?
तिष्ठतो मी तुझ्या साठी तसा तू ही तिष्ठतोस का?
सांग ना घडणार कधी जिवा-शिवाची भेट ही,
किती जंन्मांचा फेरा बाकी अजुन दृष्टी येण्यास ही।।
मंगळवार, १२/५/२६ , १२:३० PM
अजय सरदेसाई -मेघ
Sunday, 10 May 2026
कुंडलिनी — सप्त चक्र जागृती : तांत्रिक अर्थ
मूलाधार
करकोटक करावलंबीत करावली करणं करम
भुजंग भुंजित; मग भग भुयांत भुमी भं
सवितृ सार्वभौमं सतउर्जा सर्वत्रं सर्वायुतं।।
स्वाधिष्ठान
वरुण वलयित वाहिनी वर्धमान वासना
वंश वळण वळवळ; वाट वर वर वहे
विमल विशाल विश्वंभर विसर्ग विलयं।।
मणिपूर
रवि रश्मी रंजित रण रोमांच
रोषं
राग रूप रम्य; रती रती रापतो रे
ऋजु ऋद्धि ऋषि ऋतं ऋतुचक्रं
ऋतायतं।।
अनाहत
यान यायावर यमुना
यात्री यमं
योग योनी यत्न; येई येई येई रे
यशोदा यशस्वी यशोमय
योगायोगं।।
विशुद्ध
हंस हरि हरण हल्लाळ हावभाव
हिम हर्ष हळुवार; हळू हळू हं हं हं
हिरण्यगर्भं हिरण्यकश्यप हिरण्यायतं।।
आज्ञा
अंतर अंतरी अंतरात्मा अंकित अं
अज्ञान अलय अलोट; अखंड
अभेद्य अं
ओंकार ओजस्वी ओतप्रोत ओम
ओमायतं।।
सहस्रार
शून्य शांत शाश्वत शरण शमनं
सहस्र सहस्रदल; सर्व
सर्व सर्व रे
Silence
॥ ॐ ॥
१. मूलाधार (पृथ्वी तत्व — बीज: लं)
करकोटक —
महाभारतातील सर्पराज; तांत्रिक दृष्ट्या कुंडलिनी शक्ती साडेतीन
विळखे घालून मूलाधारात सुप्त अवस्थेत असते
करावलंबीत — ती
शक्ती स्वतःच्याच हाताने (करेने) स्वतःला आधार देऊन बसलेली — स्वयंपूर्ण बंधन
भुजंग भुयांत —
सर्प (प्राणशक्ती) पृथ्वीतत्वात, स्थूल देहात गुंफलेला
भं — पृथ्वी
बीजाक्षर
सवितृ सार्वभौमं
— जागृतीचे अंतिम लक्ष्य सूर्यचेतना आधीच सांगितलेले — अंत आणि आरंभ एकाच वेळी
दिसतो
तांत्रिक सार:
शक्ती झोपलेली आहे, पण तिचे गंतव्य जाणते
२. स्वाधिष्ठान (जल तत्व — बीज: वं)
वरुण वलयित —
वरुण = जलदेव; वलयित = वर्तुळात बांधलेले — जलतत्व चक्राकार फिरते
वासना वर्धमान —
स्वाधिष्ठान हे कामशक्तीचे, सृजनशक्तीचे केंद्र — वासना वाढतेच
वंश वळण — वंश =
पिढी; जलासारखे वळण घेत
प्रवाह पुढे जातो — सृष्टी सुरू राहते
विमल विश्वंभर
विसर्ग विलयं — शुद्धीकरणानंतर विसर्ग (त्याग/मोक्ष) आणि विलय (विश्वात विरघळणे)
तांत्रिक सार:
कामशक्तीचे रूपांतर सृजनशक्तीत — ऊर्जा वर चढते
३. मणिपूर (अग्नि तत्व — बीज: रं)
रवि रश्मी रंजित
— मणिपूर = मण्यांचे नगर; सूर्यासारखे तेजस्वी, किरणांनी प्रकाशित
रण रोमांच रोष —
अग्नितत्व = इच्छाशक्ती, संघर्ष, क्रोध — हे सर्व येथेच
जन्मतात
राग रती — राग
(आसक्ती) आणि रती (आनंद) अग्नीत भाजले जातात
ऋतं ऋतुचक्रं
ऋतायतं — ऋत = विश्वनियम; अग्नी सर्व ऋतू, सर्व नियम चालवतो
तांत्रिक सार:
अहंकार आणि इच्छा अग्नीत जळतात — शुद्ध इच्छाशक्ती उरते
४. अनाहत (वायु तत्व — बीज: यं)
यान यायावर यात्री —
अनाहत = हृदयचक्र; आत्मा यायावर (भटका) यात्री आहे — वायूसारखा मुक्त
यमुना यमं — यमुना =
प्रेमाची नदी (कृष्णाची); यम = मृत्यू — हृदयात प्रेम आणि मृत्यू दोन्ही
योग योनी यत्न — योनी =
उगम; येथे योगाचा खरा
उगम — प्रयत्नाने नाही तर प्रेमाने
यशोदा यशोमय — यशोदा =
निःस्वार्थ मातृप्रेम; अनाहतात स्वार्थ नाही
तांत्रिक सार: वैयक्तिक
प्रेम विश्वप्रेमात विरघळते
५. विशुद्ध (आकाश तत्व — बीज: हं)
हंस — हंस = सोहम्
मंत्राचे प्रतीक; श्वासाबरोबर "सो-हम्" (मी तोच आहे)
हरि हरण — हरि =
विष्णू/हरण करणारा; पाप हरण, द्वंद्व हरण
हिम हर्ष हळुवार —
बर्फासारखे शांत, थंड, हळुवार — आकाशतत्व निःशब्द
हिरण्यगर्भं — हिरण्यगर्भ
= सुवर्णगर्भ ब्रह्म; सृष्टीचा मूळ नाद येथून — विशुद्ध नादाचे
केंद्र
हिरण्यकश्यप — अहंकाराचे
प्रतीक; विशुद्धीत
अहंकाराचा नाश
तांत्रिक सार: नाद, वाणी, श्वास — सर्व शुद्ध होतात; "हं सः"
६. आज्ञा (मन + प्रकाश — बीज: ॐ)
अंतर अंतरी अंतरात्मा —
तीन स्तर: बाह्य मन → अंतर्मन → आत्मा — तिन्ही एकत्र येतात
अज्ञान अलय अलोट —
अज्ञानाचा पाया (अलय) उलटतो — अलोट म्हणजे न थांबणारे
अखंड अभेद्य — द्वैत
संपते — गुरु-शिष्य, शिव-शक्ती एक होतात
ओंकार ओजस्वी ओतप्रोत —
ओंकार सर्वत्र भरलेला — ओज (तेज) ओतप्रोत वाहते
तांत्रिक सार: तृतीय
नेत्र उघडतो — द्रष्टा आणि दृश्य एक होतात
७. सहस्रार (तत्वातीत — बीज: निःशब्द)
शून्य शांत शाश्वत शरण —
चार अवस्था: शून्य (रिक्तता) → शांत → शाश्वत → शरण (समर्पण)
शमनं — सर्व क्रिया, सर्व विचार शमन — पूर्ण
विराम
सहस्र सहस्रदल — सहस्र =
हजार; हजार पाकळ्यांचे
कमळ उमलते — पूर्ण जागृती
सर्व सर्व सर्व रे — भाषा
संपते, पुनरावृत्तीच
उरते — शब्द अपुरे पडतात
Silence — ॥ ॐ ॥ — भाषेच्या पलीकडे
जे आहे ते













