तू आहेस जवळी माझ्या, म्हणुनी भय नाही,
अंधार दाटला तरी, मनात संशय नाही।।
तुझ्या स्मरणाच्या दीपे, उजळती वाट सारी,
वादळ जरी उठले तरी, तारू भरकटत नाही।।
हातात हात तुझा, एवढाच धीर मला पुरे,
दुःखांच्या अरंण्यात सुद्धा, वाट हरवत नाही।।
थकल्या जीवास माझ्या, विसावा तुझ्याच छायेत,
तू साथ देत असताना, जगणे कठीण नाही।।
नयनी ठेवुनी आशा, मी दूरवर चालत राहिलो,
तुझ्या कृपेचा, पावलांना कधीच अंत नाही।।
तू आहेस जवळी माझ्या, म्हणुनी मला भय नाही,
जीवनाच्या प्रवासात, मला कोणतीच अडचण नाही।।
मंगळवार, २०/५/२६ , ११:११ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment