Total Pageviews

Wednesday, 20 May 2026

स्वरुप तुझे


स्वरूप तुझे पूर्ण ब्रह्मांडी पसरून आहे,
ब्रह्मांडाच्या पुढेही तू दशांगुळे उरून आहे।।

चंद्र, सूर्य, तारे सार्‍यांत तेज तूच आहेस,
कणाकणांत या सृष्टीत तुझेच स्पंदन भरून आहे।।

दिशा-दिशांतून वाहे तुझ्या अस्तित्वाची चाहूल,
नाद ओंकाराचा अंतर्यामी झिरपून आहे।।

शून्यातून जन्म घेती अनंत विश्वांचे मेळे,
त्यात तुझे मौनही शब्दांहूनही बोलके आहे।।

काळाच्या पल्याडही तुझेच अधिराज्य अखंड,
क्षणभंगुर या जीवनात सत्य तुझेच भरून आहे।।

मीपणाच्या भिंती सार्‍या विरघळती तुझ्या स्मरणे,
प्रत्येक थेंब अस्तित्वाचा तुझ्यातच विरून आहे।।

मंगळवार,२०/५/२६ , ११:४० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment