*मराठी भावार्थ*
त्यातून भीती, क्लेश आणि दुःखांचे जाळे निर्माण होते.म्हणून मला अजातिबोध — जन्मच नाही असा दृढ बोध करून दे आणि या घोरकष्टांतून माझा उद्धार कर.॥१॥
इंद्रियांचा समूह, मन आणि बुद्धी यांच्या संगतीने
हा संसाराचा चक्र सतत फिरत राहतो.म्हणून मला त्यांच्यापासून अलिप्त असा साक्षीभाव दृढ करून दे
आणि या घोरकष्टांतून माझा उद्धार कर.॥२॥
मी देह नाही, मी केवळ जीवही नाही;
कर्ता किंवा भोक्ता असा भाव माझे खरे स्वरूप नाही.हा स्पष्ट बोध माझ्या अंतःकरणात स्थिर करून दे आणि या घोरकष्टांतून माझा उद्धार कर.॥३॥
अविद्येमुळेच मी आज भ्रमात अडकलेलो आहे
आणि नाव-रूपांच्या जगात सतत रमून जातो.
त्या अविद्येच्या जागी खरी विद्या मला उपदेशून दे
आणि या घोरकष्टांतून माझा उद्धार कर.॥४॥
गुरुकृपेच्या तेजाने मला तुरीय शांती दे,
स्वस्वरूपात एकनिष्ठ राहण्याची दृढता प्रदान कर.
हे दत्तनाथा, माझा पुनर्जन्माचा बंध नष्ट कर
आणि या घोरकष्टांतून माझा उद्धार कर.॥५॥
हा पंचश्लोकांचा समूह आत्म्याचे कल्याण वाढवणारा आहे.जो व्यक्ती याचा नियमित आणि भक्तिपूर्वक पाठ करतो, तो श्री दत्तमहाजांना प्रिय होतो.
असे नैदृव गोत्रात जन्मलेल्या अजय शर्मा यांनी रचलेले घोरकष्टोद्धरण स्तोत्र पूर्ण झाले.
मंगळवार,३०/१२/२५ , १६:१६ PM
वैकुंठ एकादशी २०२५
अजय सरदेसाई -मेघ



