Total Pageviews

Monday, 22 December 2025

तुम्हीच ना


दत्त दिगंबर, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती तुम्हीच ना,
अक्कलकोट कोटी निवास ज्यांचा ते समर्थ सदगुरू तुम्हीच ना.

जन्मोजन्मी जवळ घेऊनी केला सांभाळ तुम्हीच ना,
कृपाप्रसादे वाहिला योगक्षेम सदगुरू स्वामी तुम्हीच ना.

चरणयुगुलांचे वेड लाऊनी भरविली भक्ती तुम्हीच ना,
तीर्थाटन घडवून मजकडून करविली देह-मन शुद्धी तुम्हीच ना.

गिरीनारी त्या परम शिखरी गोरक्षास पसन्न तुम्हीच ना,
कुरुगड्डीच्या परिटास दिला बिदरचा राजभोग तुम्हीच ना.

उत्पत्ती, क्षेम, लय ब्रह्मांडाचा करणारे ब्रह्म तुम्हीच ना,
सदगुरू ‘मेघ’ निमित्त केवळ—कार्य, कारण, कर्ता तुम्हीच ना.

सोमवार,२२/१२/२५ ,११:५१ AM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment