श्री समर्थ माउली माझा प्राण,
तेणेच दाखविला हा सुदिन,
योगक्षेम नित्य वारीतसे माझा,
स्वामीराज माझा।
तेणेच दाखविला हा सुदिन,
योगक्षेम नित्य वारीतसे माझा,
स्वामीराज माझा।
तूच माझा कैवारी,
कोणत्या कर्मांची जोडी,
न कळे ही दैवाची कोडी,
कृपादृष्टी पाहे स्वामीराज।
डोळे माझे येती भरून,
आनंद आवंढा गिळून,
उभा हात जोडून स्वामी,
चरणी तुझिया।
कोटी प्रमाद घडले मजकडून,
तरी स्वामी ठेविला तू हात धरून,
जेवी आई आपुल्या बाळास ठेवी कवटाळून,
तसे तुझे दासावर प्रेम खास,
आटता ना आटे।
जादू ही कैसी मी न जाणे,
जिव्हेस माझ्या शब्द पडती उणे,
सर्व अपराध घेसी पोटात,
मेणाहून मऊ हृदय तुझे।
ठेव तुझी कृपा अशीच,
असो दासावर प्रेम तैसेच,
नमितो ‘मेघ’ मस्तक तव चरणी,
स्वामी माझा कृपासिंधु।
मंगळवार, २४/२/२६, ९:२४ AM
अजय सरदेसाई – मेघ

No comments:
Post a Comment