Total Pageviews

Saturday, 19 September 2026

गणपती दातारा


मी तुला ध्याऊ कसा,
कसा तुला गाऊ जी
हे गणपती दातारा,
तुझे गुण गाऊ जी

तूच विघ्नहर्ता,
तूच सुखकर्ता जी
प्रत्येक कठीण क्षणी,
तूच साथ देतोस जी

बुडत्या नौकेला,
तूच पार नेतोस जी
ऋद्धी-सिद्धीचा दाता,
मोदक तुला प्रिय जी

तुझ्याविना दातारा,
जीवन अधुरे वाटे जी
मी तुला मनवू कसा,
कसा तुला बोलावू जी

हे गणपती दातारा,
घरी माझ्या यावे जी
तुझ्या येण्याने सजे,
माझे इवलेसे अंगण जी

तुझी कृपा होता,
दूर होई पीडा जी
तुझी सोंड मनोहर,
भाळी शेंदूर साजे जी

पाहता मुखडा तुझा,
मन मोहूनी जाय जी
प्रत्येक हृदयात वसे,
तुझी मूर्ती प्यारी जी

नाम तुझे जपता,
डोळे भरुनी येती जी
गणपती बाप्पा मोरया,
मुर्ती तुझी मंगल जी

तुझ्या नावाने सुरू,
प्रत्येक कार्य माझे जी
आधी तुझे नाव घेतो,
मग कार्य करतो जी

तुझी कृपा असावी,
प्रत्येक वाट सुखाची जी
मी तुला पूजू कसा,
आरती उतरवू जी

तुझ्या चरणांपुढे,
मस्तक नमवितो जी
न मागे धनदौलत,
न मागे सुख दुजे जी

फक्त तुझ्या चरणी,
जीवन सरावे जी
तूच विघ्नहर्ता,
तूच सुखकर्ता जी

तुझ्या चरणांतच,
माझा आनंद वसे जी
तुझ्या चरणी दातारा,
माझे मन राहो जी

तुझ्या नामाचा श्वास,
शेवटपर्यंत वाहो जी
गणपती बाप्पा मोरया,
मोरया,मोरया , मोरया जी

शुक्रवार, १८/९/२६ ,  ३:००  PM
अजय सरदेसाई -मेघ