आज माझ्या घरी माझे गुरुराय पावले,
भक्तासाठी दर्शन देण्या हनुमंतच धावले।
भक्तासाठी दर्शन देण्या हनुमंतच धावले।
कैंचीधामी न गेलो मी, न भेटलो कधी त्यांना,
पुस्तकांतुनी ओळख होता, ओढ लागली मना।
हाय रे कर्मा! कळले तेव्हा, गुरु देह सोडुनी गेले,
देहास गुरुतत्त्व मानण्या, मूढमतीचे मन भुलले।
जाणले मग, तत्त्व अथांग, देहात कधी न मावते,
हृदयी ओढ जागताच, भेट आपोआप घडते।
देह, काळ, दोन्ही नलगे, गुरुची इच्छा जर होते,
शिष्यसाधना प्रबळ होता, मूर्तीसमोर प्रकटते।
सोमवार, २८/९/२६ , २:३३ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment