Total Pageviews

Wednesday 28 October 2015

सावधान पुढे मोह आहे


सावधान पुढे मोह आहे !
समोरील द्रुष्य कितीही रमणीय व मनमोहक असले तरी तुम्ही धोका पत्करत आहात हे लक्षात ठेवा !
तेव्हा या मोहा पासूनसावधान !
समोरील गोष्ट दुर्मिळ , सुंदर व कितीही हवी हवीशी वाटणारी असली तरी आपण सावधानता बाळगली पाहिजे .ती नाही बाळगली तर कपाळ मोक्ष होवून प्राणास मुकावे लागते .तुम्ही अनवधानाने एक पाऊल पुढे टाकाल व सर्वस्व गमावून बसाल .तेव्हा अशा वेळी विवेक शाबूत ठेवणे वास्तवास धरून आहे .

आयुष्याचं ही असच असतं . आपल्याला आयुष्यात खूप गोष्टींची भुरळ पडते . यश , कीर्ती , श्रीमंती इत्यादी . ह्या आणि अशा प्रकारच्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण मोहात पडतो व कधी कधी वाम मार्गाकडे खेचले जातो आणि त्याच्या बळी पडतो .आपल्या मनाचा तोल निसटतो आणि आपण नकोते काम करू लागतो .
इथे आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे , सतत सावधानता बाळगली पाहिजे , मनाचा तोल सांभाळण्या साठी . आपल्या साठी श्रेयस काय आहे ? याचे सतत अवधान ठेवले पाहिजे .हीच आयुष्यात यशाची गुरु किल्ली आहे . 

II श्री गुरुदेव दत्त II


दिनांक : २८/१०/२०१५  वेळ : ५.००  PM

No comments:

Post a Comment