जे रुप तुझे साठले माझ्या मनी,
तेची रुपे यावे मम कुटीत मंगल चरणी
ओवाळीन तुला मम नयन ज्योतींनी
ठेवीन माथा पद्मयुगुले शरण येऊनी
नको आहीक काही केवळ कैवल्याची आस,
स्वामी निवारा तृष्णा, करा तृप्त या चकोरास
तन मन माया आता नकोची त्यांचे रुसणे
निर्गुणात ने रे आता नकोची ते 'मी' असणे
का मज पासुन असे दडुन बसला नाथा
का उगाच माझी सत्व परिक्षा घेता
या झडकरी नका तिष्ठत ठेऊ आता
निवांत निजुदे तव कुशीत मज ताता
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment