Total Pageviews

Friday, 30 May 2025

ओवाळीतो आरती


ओवाळीतो आरती श्री सद्गुरू राया
शरण आलो स्वामी ठेवितो मस्तक तुझिया पाया
 
स्मृतगामी म्हणती तुजला सर्व दैन्य जन
आळविता सामोरा ठाकसी दत्त म्हणुन
 
तीन शिरे सहा हात असे तुझे रुप
संहारीशी तुच जगात त्रिविध ताप
 
भक्ता साठी तुझ हृदयी भरलासे ओलावा
संकटी धावत येऊनी कर माझा धरावा
 
घडले जरी प्रमाद अनेक  रे जगजेठी
क्षमा करुन मजला धरावे तू पोटी
 
वारंवार 'मेघ' तुझी करुणा भाकतो
वाचवी तुच ता मजला साकडे घालतो
 
दिन दयाळा ओवाळीतात तुला नयनांच्या ज्योती
मान्य करी रे देवा ही निर्गुण आरती
 
२९/५/२०२५ , ०२:१५ PM
 
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment