मुखी भगवंताचे नाम,
संगे संतांची संगती।
होई वृत्तीची निवृत्ती,
मिळे प्राणास सद्गती॥
ज्याचा विवेक जागृत,
त्यासी ज्ञानामृत।
ज्ञानमंथुनी जो स्व जाणे,
तोचि मुनी॥
न मनी ज्ञानाचा अहंकार,
न विषयाचा आसूड।
अंगस्नान त्यासी न कारण,
ज्याचे मन अभोगी॥
न शास्त्राचा गर्व येथे,
न शब्दांचा पसारा।
मौनचि येथे उपदेश,
अनुभूतीचा आधार॥
जिथे कर्ता उरेना,
न उरते कर्तव्यता।
तेथे मीपण गळोनि,
उरे केवळ पुर्णता॥
‘मेघ’ म्हणे—ज्यासी हा
ज्ञानानुभव,
तोचि अमृतानुभव।
मधुहून मधुर हा जाण,
वाचे न ये वर्णिता॥
बुधवार, २१/१/२६ | ०६:०० PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

No comments:
Post a Comment