Total Pageviews

Tuesday, 26 December 2023

संक्षिप्त दत्तावतार आख्यान


ॐ श्री महागणपतये नमः

ॐ श्री महासरस्वती देव्यै नमः

ॐ श्री सप्तकोटेश्वराय कुलदेवताय नमः

श्री गुरुदत्तात्रेयाय नमः

श्री श्रीपाद वल्लभभाय नमः

श्री नृसिंह सरस्वती महाराज नमः

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

 

नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या आदिगुरु शिवशंकरु जो असे हो स्वयंभू नमितो आता दत्तात्रयु जो माझा प्राणप्रियु ज्या पासोन दत्त संप्रदायु चालत आला आज मिती। तोचि अत्री अनसूया नंदनु। आता नमु त्याचा पुर्ण अवतारु श्रीपाद श्रीवल्लभु जोका अवतरला पिठापुरु अतिपुण्य प्रदेशे। भाद्रपद शुद्ध चातृर्थीस चित्रा नक्षत्रे

श्रीपाद वल्लभु पिठीकापुरांत केल्या लिळा थोरु, जेथे असे ती आदीमाया नी पुण्य पादगया क्षेत्रु सोळा वरुसे होता पुर्ण श्रीपाद पातले कुरवपूरु जी का असे कर्म भुमी तयांची येथ असे रम्य कृष्णा तीर,राहीले श्रीपाद चौदा वर्ष येथ श्रद्ध जन तारावया। होता त्यांना वर्ष तीस,झाले गुप्त कृष्णेत,अश्विन वद्य द्वादशिस

होते त्यासी कारण रोकडे। दिले वचन पुर्ण करण्या प्रति। अवतार कार्य पुर्ण करण्या सी। घेतला जन्म लाड कांरजे ग्रामी।अंबा माधव नामे माता-पितया घरी।तेथ राहीले वरुसे आठ आणि मग निट धरीली वाट ।क्षेत्र कशी ची। मग होता वयास तिस वरुस आले पुन्हा आपुल्या ग्रामी महाराष्ट्र देशी देशाटन करीत। दिले होते वचन माता  पितयांसी पुन्हा भेटी मज असता तीस वरुस असता म्हणुन लाड कारंजा ग्रामी पातले

तेथुन आले क्षेत्री अवदुंबर जेथे होती भुवनेश्वरी। चातुर्मास करण्यास त्या नंतर पातले पुढे पंचगंगा आणि कृष्णा संगम जेथे। अमरेश्वर नामें साक्षात शंकर वसे तेथे। चौसस्ठ योगिनी क्षेत्र असे जेथे वर्षे बारा असती नृसिंह सरस्वती येथ  क्षेत्र महीमा झाला  बहुत चहुराष्ट्रा। तेथुन मग निघाले पुढते गुरुवर्य ।आणिक जनांस उधरावया निघण्या आधी  केली एक मात। मनोहर अपुल्या पादुका स्तापिती थेथे लोकहितार्थ नरसोबावाडी नामें असे आता क्षेत्र प्रसिद्ध

पुढे होते एक क्षेत्र गंधर्वपुर पुण्य-महिमेचा ज्याच्या नाही पार भिमा-अमरजा संगम तेथे थोर आणि अष्ट तिर्थे असती  राहीले तेथे अनुष्ठानीं अश्वथा सकल। ग्रामीच्या राजाने विप्रमुखे एकली लिळा थोरु दंत हीन वांझ माहीशिस आले दुग्ध  अमृतदृष्टी पहाता। विनवुनी नेला तो यती थोर ग्राम मठी। राहीले नृसिंह सरस्वती गाणगापुरी मठी।येतांच उधारीला तेथे ब्रह्मराक्षस।

 झाल्या अगणीत लिला गाणगापुरांत ।सर्व दिशांसी पसरली किर्ती। राहीले येथ चौविस वरुशे नृसिंह सरस्वती। त्यानंतर निघाले जाण्या तेथुन निजधामा।बहुधान्य नामे संवत्सरी ,उत्तरायनी ,माघ मासी वद्य प्रतिपदेसी होते  प्रिय चार शिष्य बरोबर। सोडण्यास गुरुंना गेले पाताळ गंगा तीर श्रीशैल्येसी। बनवुन एक सुंदर फुलांची नाव गुरुआज्ञे करुन आणि बसवुन गुरुराया सी दिली नाव प्रवाही सोडून।पावले श्री गुरु आपल्या गुप्त स्तानीं।पाठविला फुलांचा प्रसाद शिष्यांना खुण म्हणुन। जरी लौकिकार्थे श्री गुरु गाणगाभुवनी नसती तरी गुप्त पणे ते तेथेची वसती।ऐसेची संबोखिले शिष्यांसी नृसिंह सरस्वती।

ऐसे मग गेले साढतिनशे वर्ष। नृसिंह सरस्वती प्रकटले नृसिंहभान स्वरुपात तो दिवस असे रविवार चैत्र शुद्ध द्वितीया।अनल नाम संवत्सरे स्वामी समर्थ म्हणुन राहीले अक्कलकोटांत त्यांसी झाले हो भक्त अपरिमित। स्वामी समर्थांसी माझे मनोभावे वंदन। ऐसी अनेक रुपे दत्तात्रये घेतली केवळ भक्तांचे कारण्यासी कल्याण

"मेघ" म्हणे आणि किती गाउ दत्तात्रेयांची स्तुती।त्यांच्या लीलेसी गावयां मज शब्द फिके पडती। माझ्यात नाही हो एवढी शक्ती जे कथन केले अद्यंत त्याची स्फुर्ती ही स्वयं श्रीगुरुची देती। "मेघम्हणे मी झालो देवा तव नतमस्तकी आता प्रसन्न व्हाहो या तुमच्या दिन दासा वरती।

 

श्री गुरुदत्तात्रेयाय नमः

 

🙏🩷🙏


मंगळवार, दिनांक २६/१२/२०२३ , :४२ PM
 
अजय सरदेसाई (मेघ
)

No comments:

Post a Comment