Total Pageviews

Monday, 25 December 2023

श्री गुरुप्रार्थना


ॐ श्री गुरवे नमः ।

ॐ श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ।

ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ।

मी आता जाणिले तव समर्था ।

तु एकची ब्रम्हाविष्णोव्योमकेशा तू श्रुष्टीकर्ता ।

तुज विण न कोणतीच वार्ता चाले या त्रीजगी तत्त्वता ।

तु असे निर्गुणु आम्हांस न होय तुझा अनुमानु ।

तु असे गुरु सर्व प्रकारु तुज नोहे असे काही नसे ।

मी नेणे करावी कैसी तुझी स्तुती ।

मी नेणे करावी कैसी तुझी भक्ती ।

मी जाणे इतकेच कि तू माझा कैवारी असशी  ।

तु अवतरला असे  मेदिनीसी केवळ जन कल्याणासी ।

न्यावे मज ही सुखरुप पैल पारी करुणामूर्ती  ।

यास्तव म्या धरिले तव श्रीपादयुग्मांबुजम दृढती ।

शीघ्र करी हो स्वामिया आता कृपा माजवरती ।

विनवीत असे तुज आता  "मेघ"  कळवळीने ।

 

ॐ श्री गुरुदत्तात्रेयाय नमः ॐ

 

सोमवार दिनांक २५/१२/२३ , १:५० PM

अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment