Total Pageviews

Friday 22 December 2023

तरीही मी तुला मिळवीन


  

का बा  दत्ता घेशी तू इतकी माज़ी घोर परिक्षा ?
मज नको काहींअसे फक्त तव चरणांची कांक्षा 
 
लक्ष लक्ष भक्त तुझे असती ज्यानां मिळते तव चरण सेवा 
सप्त दिसांच्या पारायण सुखातुन का दिसांत दोन मज उठविले देवा ?
 
त्रिविक्रम भारती तव दांभिक म्हणता स्वयं कुमसी जाऊन विराटदर्शन दिलेस तेव्हा
मज कडून काय प्रमाद घडला , गुरुचरित्र- रसपान  करण्या पासुन का मज तू वंचिले देवा 
 
जरासा मज पुण्य संचय होता धृवपद का अडचणीत आले !
माझ्या सारखे किटक या जगी कित्येक आले नी कित्येक गेले।
 
तरीही का मग ही छोटीसी मनीषा माझी तु  आणली फळा 
का रे दिल्या फक्त हे गुरुराया तु मम हृदयी शुळ कळा ?
 
तुज भक्तांची नाही तृटी,हजार नव्हे रे लांखो करोडों असती  
म्हणूनच  गुरुराया तुजला असण्याची माझ्या काहीच चाड नव्हे ती 
 
असेल जरी रे हे शतवार सत्य चीमी हे  ऐसे होऊ देईन 
चौर्‍याशी कोटी जरी फेरे लागले आणिक चौर्‍यासी कोटी !
पाहू किती घेतोस परीक्षा ! गुरुदत्ता स्वामियातरीही मी तुला मिळवीन 

 

शुक्रवार दिनांक २२/१२/२३ , :०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)

 

 


No comments:

Post a Comment