Total Pageviews

Monday, 28 October 2024

दत्त महाराज

 

दत्त संप्रदायात आपण प्रवेश करत नसतो तर तो प्रवेश करवुन घेतला जातो.

पहीला रोकडा अनुभव यतो आणि दत्त महाराजांची तोंड ओळख होते. हळुहळु दत्त भक्तांची ओळख करवली जाते.त्यातुनच मग दत्त तत्वाची ओळख घडत जाते.

जशी जशी ही ओळख धृड होत जाते तसे तसे आपण महाराजांकडे खेचलो जातो.आपण कधी दत्त संप्रदायी होऊन गेलो हे आपल्याला कळत ही नाही.हा पहिला टप्पा.

या नंतर दुसरा टप्पा सुरू होतो.आणखिन नवीन अनुभव येतात.लोक तुम्हाला दत्त भक्त म्हणून ओळखु लागतात. त्यानंतर किर्तन, भजन, वरवरचं नामस्मरण याचा सपाटा सुरू होतो.सर्व सुखसोयी आपोआप तुमच्या दिमतीला येतात.देह सुखावयाला लागतो.मनांत एक सुखाची झिंग पसरते,एक अहिक माज सुद्धा येतो.आपण   दत्त संप्रदायी आहोत, महाराजांचे लाडके आहोत, लोकं आपल्याला मान देतात, आपण सुखवस्तू आहोत याचा आपणांस हळुहळु गर्व व्हायला लागतो. त्रास, दुःख,अडचण म्हणजे काय याचा महाराजांच्या लाडा मुळे विसरच पडलेला असतो.

नेमके आपण इथेच चुकतो आणि तिसरा टप्पा सुरू होतो.ते कसे,तर ते असे.महाराजांच्या भक्ती आणि महाराजां पेक्षा संप्रदाय महत्वाचा वाटायला लागतो.आपण कोणी तरी स्पेशल आहोत असे वाटायला लागते. महाराजांच्या कृपेला आपण कधी ग्राह्य धरायला लागतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.

अती तिथे माती होणारच व या उक्ती प्रमाणेच होते,आणि जो कधी नको, नेमका तोच चवथा टप्पा सुरु होतो.

महाराज असा तडाखा देतात की पळता भुई थोडी होऊन जाते. तोंडचे पाणी पळवतील. एका क्षणात तुम्हाला आसमानातुन जमिनीवर आणतील.चक्र अशी गरगर फिरतील की काय होतय हे कळण्या आधीच तुम्ही भुईवर सपाटून पडलेले असाल.

म्हणुनच म्हणतात की उतु नये,मातु नये आणि महाराजांना कधीच गृहीत धरु नये.महाराजां प्रती नेहमी आदर व सेवा भाव असावा.आपला जन्म महाराजांच्या सेवेखातरच झाला आहे असा भाव असावा. ही सेवकरतांना कोणत्याही अडचणींना तोंड द्यायची तयारी असावी आणि धृद श्रद्धा असावी की सेवकरतांना सर्व अडचणी महाराज दूर करतीलच करतील.हृदयांत महाराजांचे पदकमल , मस्तीशामध्ये महाराजांची षटभुज मूर्ती आणि जिव्हाग्री महाराजांचे नाम असावे .

अश्या ह्या चार टप्प्यातून गेल्यावर डोकं ताळ्यावर येतं, नको तो बडिवार गळून पडतो . मन स्वछ व निरोगी व्हायला लागते.विकार नाहीश्ये हवायला लागतात, सत्वगुण वाढीस लागतात. मन विवेकी आणि वैराग्यशील बनते.मनांत दत्तनाम रुजायला लागतं. अश्या परिस्तितीत हृदय म्हणजे महाराजांचे घर होऊन जाते. श्वासांत सतत हिनेच सुगंध रेंगाळत राहतो. दृष्टी नासाग्री होते.महाराज सतत बरोबर असल्याचा अनुभव येतो.अष्टभाव जागृत होतात.कुंडलिनी सरसरून मूलाधार चक्रातून वर चढत सहस्त्रासार चक्राकडे प्रवास करायला लागते.तिचे तोंड सहस्त्रासार चक्राकडे पोहचताच ती गरळ ओकते.

आता सहावा टप्पा सुरु होतो. जी गरळ कुंडलिनी ओकली ती गरळ साहतरासारांतून रिसून अमृत बनून मुखाच्या टाळूवर खाली येते आणि ब्रम्हानंदी टाळी लागते. जीवाशिवाची भेट होते. जीव व शिव एकरूप होतात.

एरव्ही जीवाशिवाची भेट होण्याकरिता षट्कर्णी योगाने (आसन , प्राणायाम ,ध्यान ,मुद्रा ,बंध आणि शुद्धीकरण ) साध्य होते पण हा योग साध्य होणे सोपे नाही.महा कर्म कठीण आहे, पण नेमकं तेच, दत्त महाराज आपल्या प्रिया भक्ताला अनायास साध्य करून देतात. परीक्षा घेतात खरी आणि चुकल्यावर चोप ही देतात,पण हे सर्व भक्ताच्या कल्याणासाठीच असतं.कुंभार जसा मातीच्या भांड्याला आकार देयण्यासाठी आतून हाताचा आधार देऊन बाहेरून  थापाड्याचे फटके देतो, तसेच हे ही आहे, महाराजांची लीला अघाध आणि अगम्य आहे , पण ती सर्व भक्त कल्याणासाठीच आहे .

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

🙏

 मंगळवार, १५/१०/२०२४ , १५:०७ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment