जरी कृपा न करिसी मजवरी,
दया तरी करी रे गुरूराया.
त्रितापाने कष्टलो मी बहु ,
मम पिडा दुर करी रे गुरुराया.
मी हिन,दिन,मी भक्ती विण,
तुजविण दाखविल मज सत्य मार्ग कोण.
गंगाधर कष्टला, तुम्ही धावुन कामधेनु परी आला,
चरित्रामृत पाजुन त्यासी तुम्ही तृप्त केला.
सायंदेव नी नंदीसी,नरहरी नी सिद्धासी,
जे जे इष्ट ते ते तुम्ही दिधले त्या शिष्यांसी.
आणिक ही दिधले तुम्ही तया चौघांसी,
प्रसाद पुष्प, बेचाळीस उद्धारवयासी.
जनकल्याण करण्यासी,
अवतरला तुम्ही धरणीसी.
पावन केली ही मेदिनी,
तुमच्या चरण स्पर्शानी.
इतुके असुन हो माझ्या सद्गुरू राया,
कष्टविसी का बा माझी मन व काया.
'मेघा' वरी आता करा हो तुम्ही दया,
सकळ कष्ट निवारा हो करुणा मया.
गुरुवार, १७/१०/२४, ०८:५० AM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment