""""""""""""""""""""
तुम्हीच सर्व निधान
""""""""""""""""""""
हिने चा तो अलवार गंध कुठे लोपला,
माझ्या घरात स्वामी तुमचा संचार का संपला.
काय चुक झाली माझी स्वामी, माझ्यावर का रुसला,
माझ्यावरचा जिव तुमचा का हो असा आटला.
स्वामी मी नाक घासतो,सोडा तुमचा रुसवा,
लेकरांच्या माये खातर,घरात पुन्हा पाय वळवा.
आई विना हो मी झालो की हो पोरका,
तुमच्या आईच्या मायेविन झालो सर्व सुखाला पारखा.
तुमचे पाय घरास लागता मिळेल सुख समाधान,
तुम्हीच माझ्या आयुष्यातील कर्ता धर्ता,तुम्हीच सर्व निधान.
शनिवार, १९/१०/२४ , ७:४९ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment