म्हणती ज्ञानोबा माऊली,
असेल पुण्य सामग्री जर कनवटी.
राम नाम तेव्हाची येई मुखावाटी,
येरव्ही स्वप्ना माजी ही न येई ते.
जन्मांतरी जमवावी सुकृत कर्मांची राशी,
जेणे घडेल सख्य त्या इश्वराशी.
प्रेमे नेऊन बैसविल त्या कारणे,
तो कृपावंत भक्त वल्लभ वैकुंठासी.
पुण्य जरी घडे या शरिरासी,
कर्म फळ मिळे त्या जिवासी.
पुण्य फळे जाय जिव वैकुंठासी,
त्या योगे उद्धरतील एकविस पितृराशी.
त्याचेनी होई कर्म निश्क्रृती,
जन्माची न होई पुनरावृत्ती.
आनंदीआनंद पसरतो ब्रम्हांडी,
हरी संगे होता एकरुप.
सोमवार, २८/१०/२४ , १३:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment