Total Pageviews

Sunday, 15 December 2024

माझे गुरुवर


गिरनारी त्या उत्तुंग चरम शिखरावर

"चरण" पादुका ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

चौसष्ट योगिनी राहती जेथे वाडीस कृष्णा तीरावर,

तेथे पादुका "मनोहर" ज्यांच्या तेच माझे गुरुवर .

 

कृष्णेच्या पश्चिम तिरी अवदुंबरी जेथे सानिध्य भुवनेश्वरी,

गुणीजन हो तेथे पादुका "विमल" ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

भिमा अमरजा संगमी,अश्वत्थ तळी जे निरंतर अनुष्ठानी,

त्या गंधर्वपुरी पादुका "निर्गुण" ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

 

रविवार , १५/१२/२०२४  , १७:३० हर्स,

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment