कृष्णा तिरी जटाधारी तो राहिला
ओ सांगा कुणी दत्त माझा पाहीला
अवदुंबर तो पसरला सभोवार
छायेसी बैसला पहा एक यतीवर
अत्री घरी त्रिमूर्ती ने घेतला दत्त अवतार
जगत कल्याणा फिरतसे पृथ्वी वारंवार
अनसुया नंदन म्हणुन पावला ख्याती
पायी खडावा,खाकेसी झोळी,कमरेला छाटी
पिठापुरी तो श्रीपाद जन्माला
येऊन कुरवपुरी प्रसिद्ध झाला
कारंजास नृसिंह म्हणून जन्मला
वनी करदळी जाऊन गुप्त झाला
प्रकटले दत्त होऊन समर्थ अक्कलकोटी
लिला केल्या असंख्य, हातात घेऊन गोटी
भक्तांचा भार निसदीनी त्यांनी वाहीला
ओ सांगा कुणी दत्त माझा पाहीला
No comments:
Post a Comment