बोलावितो पंढरीनाथ मज भेटिला पंढरीला,
मन गहीवरुन आले माझे, आनंदाचा पारिजात फुलला.
पंढरीस मी जाईन,विठ्ठलाचे चरण पाहिन,
अभंग गाऊनी चोख्याचे चंद्रभागेत न्हाहीन.
नामदेवापाशी जाईन,गुज गोष्टी करीन,
बैसून जवळ तयापासी पुसिन त्यासी भक्ती चे गहन.
जाईन त्या खांबापाशी जोका तो चोखामेळा,
डोळा भरुन पाहीन त्या खांबा आणि भेटीन गळा.
त्या कान्होपात्रा माईस जरा विचारीन वाइस,
उलघडावुन सांग सखे,माऊली हृदयी चे रहस्य,
शेवटी भेटेन माझ्या रखमाईस,घालिन लोटांगण,
पुसेन तिस ,कशी गो राहतेस तु दुर त्या विठ्ठला विण.
'मेघास' बोलाविले हरी,चल ये रे पंढरी,
मनांत झाल्या गुदगुल्या उठल्या आनंद लहरी.
रविवार, ०८/१२/२०२४ , १०:०० आम
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment