नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥
साडेसातीने ग्रासिली बुद्धी, मन आणि काया ।
सोसवेना मज आता हा त्रास, राया ।
सूर्यपुत्रा दयाघना, करी कृपाछाया ॥
दीर्घदेही विशालाक्ष, कृशोदर खंबीर ।
कलिमलदाहक तू, न्यायाधीश धीरगंभीर ।
शिवप्रिय ग्रहेश्वरा, पश्चिमेचा स्वामी वीर ॥
होता अवकृपा तुझी, कोण मग तारील?
तू राखी ज्यासी, त्यास कोण मारील?
‘मेघ’ म्हणे, तुझ्याविण मज कोण वारील ॥
आलो शरण तुला, कृपावंता ।
सोडवी क्लेश माझे, भगवंता ।
राशीस्वामी माझा शैनेश्चरा, दयावंता ।।
शनिवार, ९/५/२६ — ११:४२ AM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

No comments:
Post a Comment